वायुसेनेला सलाम... बालकोटचं शौर्य आणि 'अभिनंदनीय' पराक्रमाचा व्हिडीओ प्रसिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:09 PM2019-10-04T13:09:18+5:302019-10-04T13:36:17+5:30

हवाई दल प्रमुखांकडून एअर स्ट्राइकचा व्हिडीओ प्रसिद्ध

Indian Air Force showcases story of Balakot aerial strikes in promotional video | वायुसेनेला सलाम... बालकोटचं शौर्य आणि 'अभिनंदनीय' पराक्रमाचा व्हिडीओ प्रसिद्ध!

वायुसेनेला सलाम... बालकोटचं शौर्य आणि 'अभिनंदनीय' पराक्रमाचा व्हिडीओ प्रसिद्ध!

Next

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचा प्रमोशनल व्हिडीओ भारतीय हवाई दलानं प्रसिद्ध केला आहे. हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी हवाई दल दिनाच्या निमित्तानं बालाकोटवरील कारवाईचा व्हिडीओ जारी केला. फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी हवाई तळ उद्ध्वस्त केले होते.

हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशाकडे झेपावणारी हवाई दलाची लढाऊ विमानं, त्यांनी केलेली बॉम्बफेक, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ अशी दृश्यं दिसत आहेत. मात्र भारतीय हवाई दलानं हा व्हिडीओ प्रमोशनल म्हणून प्रसिद्ध केल्यानं व्हिडीओतील दृश्यं प्रत्यक्ष बालाकोट एअर स्ट्राइकचीच आहेत की प्रतिमात्मक स्वरुपात हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 



भारतीय हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती व्हॉईस ओव्हरमधून देण्यात आली आहे. हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत पुलवामातील हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला आक्रोश, पाकिस्तानला धडा शिकवण्याची होत असलेली मागणी, त्यानंतर  हवाई दलानं आखलेली हल्ल्याची योजना, वैमानिकांना देण्यात आलेल्या सूचना, विमानातील रडारवर दिसलेले दहशतवादी तळ, त्यावर विमानातून झालेली बॉम्बफेक दिसत आहे. 

एअर स्ट्राईक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानी हवाई दलाच्या फसलेल्या प्रयत्नाचा उल्लेखदेखील प्रमोशनल व्हिडीओत आहे. पाकिस्तानचा डाव भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी हाणून पाडत त्यांना माघार घ्यायला लावली, अशी माहिती व्हिडीओत आहे. 

Web Title: Indian Air Force showcases story of Balakot aerial strikes in promotional video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.