शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 12:50 IST

युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे.

 चंदिगड - युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे. दरम्यान, अशी ही शक्तिशाली चिनूक हेलिकॉप्टर्स आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत चंदिगड एअरबेसवर चार चिनूक हेलिकॉप्टर्सचे युनिट हवाई दलात दाखल करून घेण्याता आले. यावेळी चिनूक हेलकॉप्टर्सची मारक क्षमता देशासाठी मोठा ठेवा असून, आजचा दिवस हा भारती हवाई दलाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. असे हवाई दल प्रमुख धनोआ यांनी म्हटले आहे.  चिनूक हे महाकाय हेलिकॉप्टर सुमारे 9.6 टन वजनाचे सामाना वाहून नेऊ शकते. वजनदार साहित्य, बंदुका तसेच शस्त्रसज्ज वाहने या हेलिकॉप्टरमधून वाहून नेता येतात. दुर्गम पर्वतीय विभागातील मोहिमांमध्ये ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. लष्करी हालचालींसोबतच आपत्तीच्या प्रसंगी मदत आणि बचाव कार्यामध्येही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात.  

सर्वप्रथम 1962 मध्ये चिनूक हेलिकॉप्टर वापरात आणले गेले होते. तेव्हापासून या हेलिकॉप्टर्सच्या तंत्रज्ञानात खूप बदल झालेला आहे. तसेच व्हिएतनाम युद्धापासून अफगाणिस्तान आणि इराक युद्धापर्यंत अमेरिकेने या हेलिकॉप्टरचा अमेरिकेने प्रभावी वापर केला होता.

  भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर दाखल झाल्याने हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. तसेच दुर्गम मार्ग आणि सीमारेषेवर बांधकाम प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये ही हेलिकॉप्टर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. 

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत