शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 14:31 IST

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच्या भावासह अनेक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या या एअर स्ट्राइकच्या परिणामांचे पुरावे समोर आले असून, या जबरदस्त हल्ल्यात जैशच्या तामील उल कुराण या मदरशाच्या चार इमारती जमीनदोस्त झाल्याचे एसएआर छायाचित्रांमधून समोर आले आहे. दरम्यान, काही तांत्रिक अडचणी आणि सीमेपलीकडची गुप्त माहिती मिळण्यात असलेले अडथळे यामुळे या कारवाईत नेमका किती जणांचा मृत्यू झाला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तहेर यंत्रणांकडे  एसएआरच्या मदतीने टिपलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये हवाई दलाकडून लक्ष्य करण्यात आलेल्या चार इमारती पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलानेपाकिस्तानी हद्दीत घुसून कारवाई केल्यानंतर पाकिस्ताननेही हल्ला झाल्याची कबुली दिली होती. मात्र बालाकोट येथे ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे दहशतवाद्यांचे तळ असल्याचे वा त्यात कुणाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले नाही. मात्र हल्ला झालेल्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने प्रवेशबंदी का केली, तसेच तिथे प्रसारमाध्यमांना का जाऊ दिले नाहीत, असे प्रश्न एका भारतीय अधिकाऱ्याने उपस्थित केले आहेत. '' ज्या इमारती नष्ट करण्यात आल्या, त्यांचा वापर प्रशिक्षित दहशतवाद्यांसाठी निवासस्थानासारखा करण्यात येत होता. तसेच तिथे मसूद अझहरचा भाऊसुद्धा वास्तव्य करत होता. एसएआरच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या छायाचित्रांमधून आमच्याकडे योग्य ते पुरावे उपलब्ध आहेत. आता ही छायाचित्रे सार्वजनिक करायची की नाही याचा निर्णय राजकीय नेतृत्वाने घेतला पाहिजे,'' अधिकाऱ्यांनी सांगितले.   

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद