भारतीय वायुसेनेचा सायकलने प्रचार-प्रसार

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:19+5:302015-02-13T00:38:19+5:30

भारतीय वायुसेनेचा सायकलने प्रचार-प्रसार

Indian Air Force Cycling Promotion | भारतीय वायुसेनेचा सायकलने प्रचार-प्रसार

भारतीय वायुसेनेचा सायकलने प्रचार-प्रसार

रतीय वायुसेनेचा सायकलने प्रचार-प्रसार
अनुरक्षण कमानचा पुढाकार : तरुणांना आकर्षित करण्यासाठी सायकल अभियान
नागपूर :
देशातील तरुणामध्ये भारतीय वायुसेनेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने वायुसेनेमध्ये भरती व्हावे, या उद्देशाने सायकल अभियान आयोजित करण्यात आले आहे.
कुठल्याही समस्यांचा सामना करणे हे प्रत्येक सैनिकाच्या जीवनातील एक अभिन्न अंग आहे. या अंतर्गत अनुरक्षण कमानतर्फे नागपूर-आमला-नागपूर सायकल अभियान आयोजित करण्यात आले आहे. अनुरक्षण कमानचे परिभाषिकी व्यवस्थापक एअर कमाडोर संजय अनेजा यांच्या नेतृत्वात १२ वायुसैनिकांची चमू सहभागी होणार आहे. एकूण ४०० किलोमीटरचा हा प्रवास असून दररोज ९० ते १०० किलोमीटरचे अंतर कापले जाईल.
यादरम्यान देशाच्या संरक्षणात भारतीय वायुसेनेची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका, वायुसेनेचा गौरवशाली इतिहास, साहस आणि वायुसैनिकांची शारीरिक क्षमता, देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द यासंबंधात प्रचार-प्रसार केला जाईल. तसेच प्रत्येक ठिकाणच्या काही शैक्षणिक संस्थांनांना भेटी देऊन त्यांना भारतीय वायुसेनेच्या गौरवशाली इतिहासाबद्दल माहिती देऊन वायुसेनेत येण्याचे आवाहन केले जाईल. भारतीय वायुसेनेलाही करिअर म्हणून कसे निवडता येऊ शकते, याबाबत पटवून दिले जाईल.
अनुरक्षण कमानचे वायु ऑफिसर कमांडिंग -इन-चिफ एअर मार्शल जगजीत सिंह हे शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजता झेंडी दाखवून अभियानातील चमूला रवाना करतील. सावनेर, पांढुर्णा, मूलताई आदी शहरमार्गे १४ तारखेला आमला येथे पोहोचतील. १५ फेब्रुवारी रोजी त्याच मार्गाने परत नागपुरातील वायुसेना नगर येथील कमान मुख्यालयात पोहोचेल.

Web Title: Indian Air Force Cycling Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.