शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार; 100 लढाऊ विमानांची खरेदी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:06 IST

हवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्यासाठी तातडीने विमानांची खरेदी करण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलासाठी 100 विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 1.25 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चेन्नईत होणाऱ्या डेफएक्स्पोच्या आधी ही प्रक्रिया सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच हवाई दलाची ताकद वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. यामध्ये अमेरिका, स्वीडन, फ्रान्स आणि युरोपीयन कंपन्यांचा समावेश असेल. डेफएक्स्पो सुरु होण्याआधी विमान कंपन्यांकडून याबद्दलची माहिती मागवण्याचा हवाई दलाचा प्रयत्न आहे. 11 एप्रिलपासून चेन्नईत डेफएक्स्पो सुरु होईल. या एस्क्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. शंभरपेक्षा अधिक लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा हवाई दलाचा मानस आहे. यासोबतच मेक इन इंडियाला गती देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. परदेशी कंपन्यांच्या मदतीने भारतातच लढाऊ विमानांची उभारणी करण्याचा सरकारचा विचार आहे. हवाई दलाला लढाऊ विमानांची नितांत आवश्यकता असून याबद्दल तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. त्यामुळेच विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीशी लवकरात लवकर करार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विमानांच्या कमतरतेमुळे हवाई दलाच्या युद्धसज्जतेवर विपरित परिणाम होताना दिसतो. त्यातच येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये हवाई दलातील मिग-21 आणि मिग-27 विमाने निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी तातडीने लढाऊ विमाने खरेदी करण्याची गरज आहे.  

टॅग्स :airforceहवाईदलIndiaभारत