भारतीय वायू दलाचे AN-32 विमान बेपत्ता, २९ प्रवाशांचा जीव धोक्यात

By Admin | Updated: July 22, 2016 14:06 IST2016-07-22T13:43:18+5:302016-07-22T14:06:56+5:30

भारतीय वायू दलाचे चेन्नई तांबरामहून पोर्ट ब्लेअर येथे जाणारे एएन-३२ हे मालवाहूतक विमान बेपत्ता झाले आहे.

Indian Air Force AN-32 aircraft missing, 29 survivors under threat | भारतीय वायू दलाचे AN-32 विमान बेपत्ता, २९ प्रवाशांचा जीव धोक्यात

भारतीय वायू दलाचे AN-32 विमान बेपत्ता, २९ प्रवाशांचा जीव धोक्यात

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २२ - भारतीय वायू दलाचे चेन्नई तांबरामहून पोर्ट ब्लेअर येथे जाणारे एएन-३२ हे मालवाहूतक विमान बेपत्ता झाले आहे. तासाभरापासून या विमानाशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. या विमानात २९ प्रवासी असल्याची माहिती आहे. 
 
सकाळी ७.३० च्या सुमारास या विमानाने उड्डाण केल्याची माहिती आहे. सकाळी ७.४६ वाजता या विमानाशी संपर्क झाला होता. ८.१२ मिनिटांनी हे विमान शेवटचे रडारवर दिसले होते. भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाकडून युद्धपातळीवर या विमानाचा शोध घेतला जात आहे. 
 
विमानाला अपघात झाला तर, त्याची तात्काळ माहिती देणारी यंत्रणा विमानात आहे. बंगलाच्या उपसागरात नौदलाकडून टेहळणी विमानाव्दारे नव्या विमानाचा शोध घेतला जात आहे. डॉर्नियर विमान आणि चार युद्धनौका नौदलाने तैनात केल्या आहेत. सध्या १०० पेक्षा जास्त एएन-३२ विमाने भारतीय वायूदलाच्या सेवेत आहेत. 
 

Web Title: Indian Air Force AN-32 aircraft missing, 29 survivors under threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.