शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भारत तुमच्या पिताश्रींचा देश आहे का? फारुख अब्दुल्लांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:14 IST

भारत माझाही देश आहे. या देशावर सर्वांचा हक्क आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नवी दिल्ली: मुस्लिमांना भारतात राहण्याचा हक्क नाही, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार विनय कटियार यांना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले. कटियार यांच्याबाबत बोलायचे झाले तर ते रोजच अशाप्रकारची विधाने करत असतात. हा तुमच्या पिताश्रींचा देश आहे का? भारत माझाही देश आहे. या देशावर सर्वांचा हक्क आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. कटियार अशाप्रकरची वक्तव्ये करून देशात फक्त द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. धर्म हा काही द्वेषाचा विषय नाही. याउलट धर्म प्रत्येकावर प्रेम करण्याचा आणि त्यांचा आदर करण्याची शिकवण देतात, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवणाऱ्यांना तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेचा कायदा करण्याची मागणी केल्यानंतर विनय कटियार आक्रमक झाले होते. मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. मग मुस्लिमांनी भारतात राहण्याची आवश्यकताच काय आहे?, असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच मुस्लिमांना वेगळा भूभाग देण्यात आला असल्याने भारतामधील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात राहायला जावे, असेही कटियार यांनी म्हटले होते. 'हिंदू' असल्याचे मान्य असेल तरच मुस्लिमांनी भारतात राहावे- सुब्रमण्यम स्वामीमुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर त्यांना आपले पूर्वज हिंदू असल्याचे मान्यच करावे, असे वक्तव्य भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. भारतात राहायचे असल्यास मुस्लिमांना काही अटी मान्य कराव्या लागतील. तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर तुमचे पूर्वज हिंदूच होते, ही बाब तुम्हाला निर्विवादपणे मान्य करावी लागेल. मुस्लिमांचा मूळ डीएनए हिंदूंचाच आहे, यामध्ये कोणतीही शंका नसल्याचेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Muslimमुस्लीमFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाcongressकाँग्रेस