शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटर-सरकार यांच्यातील वाद ‘कू’वर; ट्विटरने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 03:07 IST

माहिती तंत्रज्ञान सचिवांशी चर्चा होण्यापूर्वीच ट्विटरने आपली भूमिका जाहीर केली, हे योग्य नसल्याचे सरकारने ‘कू’ या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग ॲपवर स्पष्ट केले.

नवी दिल्ली : काही दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्र सरकार व ट्विटर यांच्यातील शीतयुद्धाला बुधवारी तोंड फुटले. ‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम्ही काही ट्विटर अकाउंटस्‌ निलंबित केली असून, ती देशाबाहेर सक्रिय असतील; परंतु अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आम्ही आदर करत असल्याने काही ट्विटर अकाउंटस निलंबित केली नाहीत’, अशी भूमिका ट्विटरने मांडली. ब्लॉगच्या माध्यमातून मांडलेल्या या भूमिकेला केंद्र सरकारने आक्षेप घेतला. माहिती तंत्रज्ञान सचिवांशी चर्चा होण्यापूर्वीच ट्विटरने आपली भूमिका जाहीर केली, हे योग्य नसल्याचे सरकारने ‘कू’ या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग ॲपवर स्पष्ट केले.कृषिविषयक कायद्यांना विरोध करणारे शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यावरून सरकारविरोधात ट्विटरवर सुरू असलेल्या हॅशटॅग मोहिमा, २६ जानेवारी रोजी झालेला गोंधळ या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ४ फेब्रुवारी रोजी ट्विटरला पत्र लिहून १,१७८ अकाउंटस्‌वर गदा आणण्याची सूचना केली होती. यातील काही अकाउंटस्‌ पाकिस्तान व खलिस्तान समर्थकांचे होते, असा दावाही केंद्राने केला होता. सरकारच्या या सूचनांवरून ट्विटरने काही अकाउंटस्‌वर कारवाई केली. त्यासंदर्भातील माहिती देणारा ब्लॉगच ट्विटरने बुधवारी प्रसिद्ध केला. २६ जानेवारीला झालेल्या प्रकारानंतर काही काळ विशिष्ट ट्विटर अकाउंटस्‌वर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यावरील निलंबन उठवले. ५०० अकाउंटस्‌वर कारवाई केल्याचे टि्वटरने म्हटले आहे.ब्लॉगमधील ठळक मुद्देवृत्तमाध्यमे, पत्रकार, चळवळीतील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या ट्विटर अकाउंटस्‌वर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच ठरले असते.ट्विटर कायम अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आदर राखत आले असून, यापुढेही त्याचा पुरस्कार केला जाईल.आमच्या देशविशिष्ट ‘विथहेल्ड कंटेंट’ धोरणानुसार काही ट्विटर अकाउंटस्‌वर कारवाई करण्यात आली असून, केवळ भारतापुरतीच ही कारवाई मर्यादित आहे.कोणाचे काहीही विचार असोत. ते इतरांपर्यंत पोहोचायला हवेत, निरोगी, खुली सार्वजनिक चर्चा व्हायला हवी, ही मूल्ये आम्ही जपली असून त्याचा पुरस्कार यापुढेही करत राहू. 

टॅग्स :Twitterट्विटर