शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

जगबुडीच्या आधी ‘भारतबुडी’चा असेल धोका; आयपीसीसीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 6:28 AM

गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत.

- श्रीमंत माने / निशांत वानखेडेनागपूर : भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान देणारा, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येचे पोषण करणारा हिंदी महासागर ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकला आहे. जगाच्या अन्य भागांत तापमानवाढीचे संकट किती भयावह असेल ही दूरची गोष्ट पण जगबुडीच्या आधी भारतालाच हवामानबदलाचा अधिक धोका असल्याचे इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत. प्रशांत, अटलांटिक किंवा अन्य महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक वेगाने असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी ३.७ मिलीमीटरने वाढत आहे. सध्याच्या वेगाने एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तीन फुटाने वाढेल व त्यामुळे समुद्रकिनारे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आयपीसीसीसोबत एक टूल तयार केले आहे. त्यात २०२० ते २१५० पर्यंत दर दशकात पृथ्वीवरील समुद्राची पातळी कशी कशी वाढत जाईल व कोणता भाग पाण्याखाली येईल हे कळेल. भारतातील कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मुरगाव, मंगलोर, कोची, तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप, किद्रोपार ही शहरे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. शंभर वर्षांचे बदल एका वर्षांतहिंदी महासागर हा पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचा, २०% पाणी सामावणारा महासागर.तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत दरवर्षी ३.७ मिमी इतकी वाढ.औद्योगिक क्रांतीच्या आधी जे बदल शंभर वर्षांमध्ये घडत होते ते आता एकाच वर्षात.संपूर्ण एकविसाव्या शतकात समुद्राची पातळी वाढतच जाईल, असा इशारा.कार्बन व द्रवरूप धुलिकण उत्सर्जनामुळे मोसमी पावसाचे वेळापत्रक विस्कळीत.उत्सर्जन रोखण्यात यश मिळविले तर पावसाचे प्रमाण वाढण्याची भीती.