शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील जहाज तोडणी उद्योग भारताकडे वळवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:01 IST

केंद्राचा प्रयत्न; केला नवीन कायदा

नवी दिल्ली : जहाज तोडणी व त्याच्या भंगाराच्या पुनर्प्रक्रियेसंदर्भात यंदाच्या वर्षी नवीन कायदा केल्यानंतर जगभरातील ६० टक्के जहाज तोडणी उद्योग भारताकडे वळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. युद्धनौका व अन्य प्रकारच्या जहाजांच्या तोडणीचा त्यात समावेश आहे. ही माहिती केंद्रीय जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी दिली. ते म्हणाले की, देशामध्ये जहाज तोडणी व भंगार पुनर्प्रक्रिया उद्योगाचा पसारा आणखी मोठा झाल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न २.२ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या या उद्योगातून १.३ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळते. गुजरातमधील अलंग हे देशातील सर्वात मोठे जहाजतोडणी केंद्र आहे. त्याशिवाय मुंबई, कोलकाता बंदर, केरळमधील अझिक्कल येथेही हे काम केले जाते. जगभरामध्ये दरवर्षी १ हजार जुन्या जहाजांची तोडणी होऊन त्यांच्या भंगारावर पुनर्प्रक्रिया होते. त्यापैकी एकट्या भारतात ३०० जहाजांवर ही प्रक्रिया केली जाते.

जहाजतोडणीसंदर्भातील जागतिक निकष भारताने पूर्ण न केल्यामुळे तिथे अमेरिका, जपान, युरोपीय देश आजवर आपली जुनी जहाजे तोडणीसाठी पाठवत नसे. पण आता जहाज तोडणीचे काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हाँगकाँग परिषदेत ज्या उपाययोजना ठरविल्या गेल्या, त्या भारताने नव्या कायद्याद्वारे मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता विविध देशांतील जहाजांच्या तोडणीचे काम भारतात मोठ्या प्रमाणावर येण्यास कोणतीच अडचण उरलेली नाही.भारताचा वाटा ३० टक्केमनसुखलाल मांडवीया यांनी सांगितले की, जगातील जहाज तोडणी उद्योगातील ९० टक्के काम हे भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश या चार देशांत चालते. त्यामध्ये भारताचा वाटा ३० टक्के असून दरवर्षी ७० लाख टन इतक्या जहाज भंगारावर देशात पुनर्प्रक्रिया केली जाते. अलंग बंदरात हाँगकाँग परिषदेने आखून दिलेल्या निकषांनुसार जहाज तोडणी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. त्यामुळे अमेरिका, जपान, युरोपीय देश व अन्य देशांकडूनही जुनी जहाजे तोडण्याचे काम भारताला मिळू शकेल. जगभरात ५३ हजार मोठ्या आकाराची व्यापारी जहाजे असून दरवर्षी त्यातील १ हजार जुन्या जहाजांची तोडणी होते.

टॅग्स :ministerमंत्रीIndiaभारत