ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी भारत हा अतुल्यच राहणार - आमिर खान
By Admin | Updated: January 7, 2016 18:22 IST2016-01-07T18:11:19+5:302016-01-07T18:22:48+5:30
अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झळाकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत

ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी भारत हा अतुल्यच राहणार - आमिर खान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झऴकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत मोहिमेसाठी झालेला करार संपला असून त्याला काढले नसल्याचा दावा करत मिडीयामध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.
मात्र, यावर आमिर खाने मिडीयाशी बोलताना सांगितले की, गेली दहा वर्षे मी अतुल्य भारत मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होतो. हा माझ्यासाठी मोठा सन्मान समजतो. देशाची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढेही देशाची सेवा करण्यास तयार आहे. आत्तापर्यंत मी पब्लिक सर्व्हिस फिल्मसाठी मोफत काम करत आलो आहे. अशाप्रकारे मला देशाची सेवा करण्यासाठी संधी मिऴाली, त्यामुळे मला हा मिऴालेला सन्मान समजतो. अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर असावा की नाही, असल्यास कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार सरकारचा आहे. त्यामुळे अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन मला काढण्याचा सरकारच्या निर्णयाचा मी आदर करतो. सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार असल्याचे आमिर खानने सांगितले.