शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना हवाई हद्द नाकारणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 12:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरेबिया दौऱ्यासाठी भारताने पाकिस्तानकडे हवाई हद्दीची परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानकडून ती नाकारण्यात आली होती.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरेबिया दौऱ्यासाठी भारताने पाकिस्तानकडे हवाई हद्दीची परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानकडून ती नाकारण्यात आली होती. पाकिस्तानच्या या निर्णयाविरुद्ध आता भारत आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संघटनेकडे उपस्थित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी रविवारी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीची परवानगी मिळावी, यासाठी विनंती करण्यात आली होती. मात्र, भारताची ही विनंती फेटाळण्यात आली असल्याचे सांगितले होते. यानंतर भारताकडून हा विषय आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेकडे नेणार असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितल्यानंतर ती उपलब्ध करून देण्यात येते. 

पाकिस्ताने याआधीही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी नाकारली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याने भारताकडून पाकिस्तानला या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी मिळण्यासाठी रितसर विनंती करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने भारताची ही विनंती फेटाळत नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा हवाई मार्ग खुला करण्यास नकार दर्शविला होता.दरम्यान, सौदी अरेबियात 29 ऑक्टोबरला होणाऱ्या एका संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा या संमेलनात भाग घेण्यासाठी 28 ऑक्टोबरला सौदी अरेबियाला जाणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान