शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर भारताला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:58 IST

ट्रम्प यांच्या भेटीत तीन अब्ज डॉलरच्या लष्करी उपकरणांचा करार

नवी दिल्ली : तीन अब्ज डॉलरच्या करारावर शिक्कामोर्तब करून भारत व अमेरिकेने संरक्षण सहकार्य वृद्धिंगत केले. या करारानुसार अमेरिकेकडून भारत जगातील सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर, तसेच अत्याधुनिक लष्करी उपकरणे खरेदी करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापार संबंध, ऊर्जा सहकार्य व दहशतवादासह सामरिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दोन्ही देश कट्टर इस्लामिक दहशतवादापासून आपल्या जनतेचे रक्षण करण्यास बांधील असल्याचे ठामपणे सांगितले. पाकिस्तानातील सक्रिय दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही प्रभावीपणे काम करीत आहोत. त्यासाठी आमच्यात संरक्षण सहकार्य असेल, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, या करारामुळे संयुक्त संरक्षण क्षमता वाढेल. मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मुख्य भर परस्पर द्विपक्षीय आर्थिक संबंधांवर होता.सर्वंकष व्यापार करारासाठी प्रगती झाली आहे. या कराराला आम्ही अंतिम स्वरूप देऊ, अशी आशा आहे. आपण सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताला होणारी निर्यात ६० टक्के वाढली आहे, असे ट्रम्प म्हणाले.संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून दोन देशांत आज तीन अब्ज डॉलर्सचे संरक्षण करार झाले. ऊर्जा क्षेत्रातील एका करारासह तीन सहमती करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. भारत व अमेरिका यांनी परस्परसंबंध जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचे ठरवले आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, दोन देशांतील संबंध फक्त सरकारच्या पातळीवर नसून, ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. अमली पदार्थांच्या वाहतुकीला अटकाव करण्यासाठी नव्या व्यवस्थेवर आम्ही सहमत आहोत.मोदींवर आहे लोकांचे प्रेम - डोनाल्ड ट्रम्पट्रम्प यांनी त्यावर भारतातील गेले दोन दिवस खूपच आश्चर्यकारक होते अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. ते मोदी यांना उद्देशून म्हणाले : ही भेट माझ्यासाठी मोठा सन्मान होता. स्टेडियममधील सव्वालाख लोक माझ्यापेक्षा तुमच्यासाठी आले होते. मी तुमचे नाव घेताच लोक जयघोष करायचे. लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका