टांझानियातील गॅस क्षेत्राचा भारत करणार विकास!

By Admin | Updated: June 19, 2015 23:22 IST2015-06-19T23:22:29+5:302015-06-19T23:22:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जकाया मृशो किक्वेते यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय मुद्यांवर व्यापक चर्चा झाली.

India will develop gas sector in Tanzania! | टांझानियातील गॅस क्षेत्राचा भारत करणार विकास!

टांझानियातील गॅस क्षेत्राचा भारत करणार विकास!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जकाया मृशो किक्वेते यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय मुद्यांवर व्यापक चर्चा झाली. टांझानियातील नैसर्गिक वायू क्षेत्र विकासासाठी मदतीचा प्रस्ताव भारताने यावेळी ठेवला, शिवाय आफ्रिकी देशातील लोकांना ई-पर्यटन व्हिसा सुविधा देण्याचा निर्णयही जाहीर केला.
मोदी-किक्वेते यांच्यातील चर्चेदरम्यान उभय देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात परस्पर सहकार्यासाठी एक संयुक्त कृती समूह गठित करण्याचा निर्णय घेतला. तसेच विविध क्षेत्रातील द्विपक्षीस संबंध दृढ करण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या के ल्या. किक्वेते यांनी यावेळी भारताकडून मिळणाऱ्या निरंतर सहकार्यासाठी मोदींचे आभार मानले.

Web Title: India will develop gas sector in Tanzania!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.