शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 22:16 IST

"देशातील 25 कोटी लोकंना गरिबीतून बाहेर काढले; 140 कोटी भारतीय आमची ताकद"

PM Narendra Modi : "देशात प्रचंड बदल होतोय, आपण आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहोत. आर्थिक सुधारणांद्वारे सरकारने केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण केले नाही, तर सुमारे 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे", असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते शुक्रवारी(4 ऑक्टोबर) कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

140 कोटी भारतीय आमची ताकद पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "लवकरच भारतात 5 सेमीकंडक्टर प्लांट असतील. आपण सेमीकंडक्टर चिप्स भारतात बनवून संपूर्ण जगाला पुरवू. या मेड इन इंडिया चिप्सचा भारतासह संपूर्ण जगाला फायदा होईल. सर्व प्रकारच्या धोरणात्मक सुधारणा करून भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ण लाभ देत आहोत. 40 हजारांहून अधिक नियमांमध्ये बदल करून आम्ही कंपनी कायदा व्यावसायिकांच्या हिताचा बनवला आहे. 140 कोटी भारतीय हीच आमची ताकद आहे, आम्ही भारताच्या भल्यासाठी अधिक संरचनात्मक सुधारणा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत."

जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था..."भारताच्या आर्थिक प्रगतीसोबत सर्वांना बरोबर घेऊन जात आहोत. याचाच परिणाम म्हणजे, गेल्या 10 वर्षात जवळपास 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आम्ही सुधारणांच्या मार्गावर पुढे जात राहू. आमचे सरकार सुधारणा आणि परिवर्तन करणारे आहे. आम्ही देशाला वेगाने पुढे नेत राहू. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारताचा जीडीपी जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल", असा दावा पीएम मोदींनी यावेळी केला.

2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येयमोदी पुढे म्हणतात, "'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' या तत्त्वावर सातत्याने निर्णय घेऊन सरकार देशाला वेगाने पुढे नेत आहे. केंद्र सरकार सातत्याने सुधारणांचा पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहे. भारतामध्ये आर्थिक वाढीसोबतच समावेशालाही चालना दिली जात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.आज भारत हे जगातील गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. हे गेल्या 10 वर्षांत केलेल्या सुधारणांमुळे आहे. सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्यास मदत करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे."

आज जगाचा भारतावर विश्वास आहे"मजबूत पायावर आधारित शाश्वत उच्च विकासाच्या मार्गावर भारत अव्वल स्थानावर राहण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. आज संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 81 व्या क्रमांकावरून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. आम्ही संशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. भारत हा दुचाकी आणि ट्रॅक्टरचा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. पूर्वी आपण मोबाईल फोन आयात करायचो, पण आज भारतात 33 कोटींहून अधिक मोबाईल फोन बनवले जात आहेत. आज जागतिक आणीबाणीच्या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा देश बनला आहे", असेही मोदी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा