शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

भारत बनेल ‘एआय’ पाॅवरहाउस- ‘एनव्हिडिया’ AI चिप निर्माता कंपनीचे सीईओ जेन्सेंग हुआंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 13:19 IST

साॅफ्टवेअर उद्याेगासाठी भारत ‘प्रिय’

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जगभरातील संगणक उद्याेगासाठी भारत ‘प्रिय’ असून, २०२४ मध्ये भारतातील संगणकीय क्षमतेत २० पट वाढ हाेणार आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेेलिजन्स’च्या क्षेत्रातही (एआय) भारत माेठी झेप घेणार असून, साॅफ्टवेअरची निर्यात करणारा भारत लवकरच ‘एआय’ क्षेत्रातील निर्यातीमध्ये आघाडी घेईल, असा दावा ‘एनव्हिडिया’ या एआय चिप निर्माता कंपनीचे सीईओ जेन्सेंग हुआंग यांनी केला.

मुंबईत आयाेजित एआय संमेलनात ते बाेलत हाेते. हुआंग यांनी भारतात एआय तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी एनव्हिडियाच्या कटिबद्धतेवर जाेर देताना सांगितले की, पारंपरिकदृष्ट्या साॅफ्टवेअर निर्यातीचे केंद्र राहिलेला भारत आता बॅक ऑफिस साॅफ्टवेअर उत्पादनांपासून  ‘एआय’ विकास आणि वितरणात पाॅवरहाउस हाेण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

भारत जगाला केवळ सीईओ नव्हे तर सर्वाेत्तम एआय देणार : मुकेश अंबानी

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यावेळी ‘एनव्हिडीया’च्या भागीदारने भारतात ‘एआय काॅम्प्युटिंग’चा पाया उभारणार असल्याचे जाहीर केले. एआय संमेलनात अंबानी आणि हुआंग यांनी भारतातील एआयच्या विकासाबाबत तसेच देश या क्षेत्रात एक जागतिक नेतृत्व म्हणून उभे राहत असल्याबाबत चर्चा केली. अंबानी म्हणाले की, भारत एका बुद्धिमत्तेच्या युगाच्या उंबरठ्यावर आहे. येणाऱ्या काळात गाेपनीयतेच्या उद्याेगात भारत जगाला चकित करणार आहे. एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे लाेकांच्या आकांक्षा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे. भारत जगाला केवळ सीईओ नव्हे तर सर्वाेत्तम ‘एआय’देखील देणार आहे.

‘एआय काेणाच्या नाेकऱ्या नाही घेणार’

‘एआय’मुळे नाेकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झालेल्या चिंतेबाबत हुआंग यांनी सांगितले की, एआय नाेकऱ्यांना पूर्णपणे संपविणार नाही. मात्र, काम करण्याच्या पद्धतीत माेठे बदल घडवून आणेल. जाे चांगले काम करण्यासाठी एआयचा वापर करेल, ताे दुसऱ्याची नाेकरी हिरावून घेईल, असे हुआंग म्हणाले.

‘एआय करणार वाहतूक नियंत्रण’

वाहतूक नियंत्रण तसेच नियम मोडणाऱ्यांना दंड लावण्यासाठी एआयचा वापर करण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत गुरुवारी दिली. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत