शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेला अच्छे दिन! 2018 मध्ये सर्वाधिक वेगानं वाढणार- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:06 IST

आशिया खंडात भारतीय अर्थव्यवस्था वेगानं घोडदौड करणार

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षात अर्थव्यवस्था वाढीच्या वेगात आशिया खंडातील देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असेल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. 2018 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग 7.4 टक्के इतका असेल. तर 2019 मध्ये हा वेग 7.8 टक्क्यांवर जाईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अहवालात म्हटलंय. यामुळे आर्थिक आघाडीवर मोदी सरकारसाठी परिस्थिती अनुकूल असेल, असं चित्र दिसतंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 'एशिया अॅण्ड पॅसिफिक रिजनल इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्ट' जाहीर केला. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विशेष उल्लेख करण्यात आलाय. 'नोटाबंदी आणि जीएसटीच्या परिणामांमधून भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय. या दोन निर्णयांमुळे देशांतर्गत वस्तूंच्या विक्रीचं प्रमाण वाढलंय,' असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अहवालात नमूद केलंय. भारतातील ग्राहक मूल्य निर्देशांक नियंत्रणात राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलाय. वाढत्या महागाईचा विचार करुन रिझर्व्ह बँकेनं सतर्क राहून धोरणांची आखणी करावी, असा सल्लादेखील अहवालातून आलाय. 2017 मध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली. 2018 आणि 2019 मध्ये हा निर्देशांक 5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2017-18 मध्ये महसुली तूट वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलीय. मात्र परकीय गुंतवणुकीमुळे यामध्ये किंचित वाढ होईल, असा उल्लेखदेखील अहवालात आहे. भारतानंतर दक्षिण आशियात बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक असेल. 2018 आणि 2019 मध्ये बांगलादेशची अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढेल, असं अहवाल सांगतो. यानंतर श्रीलंका आणि नेपाळचा क्रमांक लागतो.  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत