लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू: ८१४ किमी लांब असलेली 'एलओसी' म्हणजे नियंत्रण रेषा नक्की आहे तरी काय? गेल्या ७७ वर्षापासून केवळ बातम्यांमधली एक ओळ नव्हे, तर एक सतत जिवंत रणभूमी बनून राहिलेली ही रेषा आहे. अखनूर सेक्टरमधील मनावर तवीच्या भुरेचक गावापासून सुरू होणारी आणि कारगिलमध्ये सियाचीन ग्लेशियरला भेटणारी नियंत्रण रेषा आज जगातील सर्वात धोकादायक मानली जाते. कारण क्वचितच असा एक दिवस जातो जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये गोळीबाराची घटना घडत नाही. म्हणूनच याला जगाची जिवंत युद्धभूमी म्हणूनही ओळखले जाते.
सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होतो.
आंतरराष्ट्रीय सीमापाकिस्तानबरोबर जम्मू-काश्मीरच्या २६४ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पंजाब राज्यातील पहाडपूर भागापासून सुरू होऊन अखनूर सेक्टरच्या मनावर तवी भूरेचक गावापर्यंत जाते. याला आंतरराष्ट्रीय सीमा असे नाव दिले आहे.
सीमेचा आश्चर्यजनक पैलू हा आहे की, यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना वर्किंग बॉर्डर म्हटले जाते. हा सर्व भाग वादग्रस्त आहे, म्हणून त्याला वर्किंग बॉर्डर म्हटले जाते. यात काही ठिकाणी सीमेचा वाद आहे तर, काही ठिकाणी कब्रस्तानचा. काही ठिकाणी शेतजमिनीचा वाद आहे.
एलओसी अर्थात...वर्ष १९४९ मध्ये पाक व भारत यांच्यात झालेल्या कराची समझोत्यानुसार, अंतर्गत युद्ध रोखल्यानंतर सीमेचे निर्धारण करण्यात आले. युद्धक्षेत्रांत त्याला युद्धबंदी रेषा अर्थात नियंत्रण रेषा नावाने म्हटले जाते. याचा अर्थ असा की, युद्धबंदीच्या वेळी ज्याचे ज्या जागेवर नियंत्रण होते, तेथेच त्याचे नियंत्रण राहील. तेथून पुढे सैनिकांना जाता येत नाही. अशा प्रकारे दोन्ही देशांतील युद्धबंदी रेषा अर्थात नियंत्रण रेषा म्हणजेच मानसिक व अदृश्य रूपात दोन्ही देशांना विभागणारी रेषा ८१४ किलोमीटरची आहे.