शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:31 IST

एनडीए खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य, ‘एनडीए’तील घटक पक्षांकडून कराराबद्दल मोदी यांचे अभिनंदन 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: भारत-अमेरिका व्यापार करार हा मोठा निर्णय असून, तो देशातील सर्वांसाठी लाभदायक ठरेल, तसेच आमचे सरकार नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी काम करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या सदस्यांनी युरोपियन युनियन आणि अमेरिकेबरोबर झालेल्या व्यापार करारांबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. 

व्यापार करारांतर्गत अमेरिकाभारतीय वस्तूंवरील रेसिप्रोकल टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली आहे. मोदी म्हणाले की, अमेरिका, युरोपियन युनियनशी झालेले करार भारतीय उत्पादक, निर्यातदार आणि उद्योजकांना बळकटी देतील.  

एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर त्यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नऊ व्यापार करार पूर्ण झाले आहेत. भारताचे एकूण ३९ देशांशी व्यापार करार झाले आहेत. शिंदेसेनेचे खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, भारत-अमेरिका आणि भारत-युरोप यांच्यातील व्यापार करारांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते. 

व्यापारी कराराचे एनडीए खासदारांकडून स्वागत

शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील फलदायी चर्चेनंतर ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याची घोषणा झाली.या घडामोडींचे एनडीए खासदारांनी बैठकीत स्वागत केले. या बैठकीत भाजपचे नवे अध्यक्ष नितीन नबीन यांचे अभिनंदन केले.

करारामुळे संबंध होणार आणखी दृढ : अमित शाह

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढेल, तसेच व्यापार संबंध अधिक दृढ होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, या करारामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांनाही मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक करारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मी अभिनंदन करतो.

घाईगर्दीने मतप्रदर्शन अयोग्य : मायावती

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय वस्तूंवरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अमेरिकेचा निर्णय देशाच्या हिताचा आहे की नाही, हे ठरविणे सध्या घाईगर्दीचे ठरेल. भारत-अमेरिका व्यापारी कराराचे संपूर्ण तपशील अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच कराराचा देशावर, विशेषतः बहुजन, गरीब, आणि महिलांच्या भवितव्यावर कसा परिणाम होतो, हे स्पष्ट होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने या व्यापार करारावर सविस्तर स्पष्टीकरण दिल्यास ते अधिक चांगले होईल.

दुग्धव्यवसायाच्या हिताचे करारामुळे रक्षण - गोयल 

भारताने अमेरिकेशी एक अतिशय चांगला व्यापार करार केला आहे. त्यामध्ये देशातील कृषी व दुग्धव्यवसायाच्या हिताचे रक्षण करण्यात आले आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी सांगितले. कराराचे स्वरूप स्पष्ट करणारे संयुक्त निवेदन भारत-अमेरिकेतर्फे लवकरच जारी केले जाईल, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : India-US trade deal: A major, beneficial decision for all Indians.

Web Summary : PM Modi hails the India-US trade deal as beneficial for all. The agreement reduces reciprocal tariffs, boosting Indian exports. NDA MPs welcome the deal, while Mayawati calls for careful assessment. The deal will strengthen relations.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिका