शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

Russia : भारत विश्वसनीय सहयोगी, पाकशी मर्यादित सहयोग- रशिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:53 IST

Russia : रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी भारत, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर २००३च्या युद्धबंदी कराराचे कठोरपणे पालन करण्याच्या वचनबद्धतेचे स्वागत केले आहे.

नवी दिल्ली : भारत एक विश्वसनीय सहयोगी असून, आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची मतभिन्नता किंवा चुकीच्या संकल्पना नाहीत, असे रशियाने बुधवारी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर स्वतंत्र संबंधांच्या आधारावर पाकिस्तानबरोबर सीमित सहयोग आहे, असेही त्या देशाने स्पष्ट केले आहे.रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी भारत, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर २००३च्या युद्धबंदी कराराचे कठोरपणे पालन करण्याच्या वचनबद्धतेचे स्वागत केले आहे. दोन्ही देश, तसेच क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहेत, असेही ते म्हणाले.बाबुश्कीन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत रशियन राजदूत निकोलाई कुदाशेव यांनी पश्चिमी देशांच्या हिंद-प्रशांत रणनीतीवर टीका करताना म्हटले आहे की, हे धोकादायक व शीत युद्धाच्या मानसिकतेतून बाहेर येण्याचा प्रयत्न मानले पाहिजे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर क्षेत्रीय सहमती बनविण्याच्या प्रक्रियेत भारताला सहभागी करून घेतले पाहिजे व अफगाण शांतता प्रक्रियेबाबत नवी दिल्ली, तसेच मास्कोचा दृष्टिकोनसारखाच आहे, असे बाबुश्कीन यांनी म्हटले आहे.रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांचा भारत दौरा व त्यानंतर त्यांच्या पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बाबुश्कीन म्हणाले की, पाकिस्तानशी आमचे स्वतंत्र संबध आहेत. त्यामुळे अन्य कुणाशी असलेल्या संबंधांच्या विरोध म्हणून त्याकडे पाहिले जाऊ नये. यामुळे भारत-रशियात कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या संकल्पना आहेत, असे मानण्याची गरज नाही. भारत-रशिया संबंधांत असे काहीही नाही.दरम्यान, कुदाशेव यांनी म्हटले आहे की, भारत हा रशियाचा विश्वसनीय सहयोगी आहे व दोन्ही देशांतील संबंध समान, समग्र, सद्भावनापूर्ण, ठोस व भविष्योन्मुखी आहेत. रशियाचे विदेशमंत्री लावरोव यांच्या ६ एप्रिलच्या भारत दौऱ्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, याचा उद्देश या वर्षीच्या उत्तरार्धात होणार असलेल्या भारत-रशिया शिखर चर्चेची तयारी करणे हाच होता.

दहशतवादाच्या विरोधातील लढाई, समान अजेंडारशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी म्हटले आहे की, भारत, पाकिस्तान व रशियासह शांघाय सहयोग संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्यात क्षेत्रीय सुरक्षा, दहशतवादाच्या विरोधातील लढाई, इतर धोक्यांच्या मुकाबल्यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहयोग आहे. रशियाचे पाकिस्तानसमवेत भारताच्या तुलनेत मर्यादित संबंध आहेत. तथापि, दहशतवादाच्या विरोधातील लढाई समान अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला दहशतवाद विरोधी उपकरणे व समर्पित अभ्यासात सहयोग करीत आहोत.

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत