भारत हा सहिष्णूच - सनी लिऑन

By Admin | Updated: December 7, 2015 14:25 IST2015-12-07T14:13:26+5:302015-12-07T14:25:56+5:30

असहिष्णूतेवरून वेगवेगळी मतं देशभरात व्यक्त होत असताना, पॉर्न स्टार सनी लिऑनने भारतात सहिष्णूता असल्याचे सांगताना जर भारत सुरक्षित नसता तर मी इथे राहिलेच नसते

India is tolerant - Sunny Leone | भारत हा सहिष्णूच - सनी लिऑन

भारत हा सहिष्णूच - सनी लिऑन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - असहिष्णूतेवरून वेगवेगळी मतं देशभरात व्यक्त होत असताना, पॉर्न स्टार सनी लिऑनने भारतात सहिष्णूता असल्याचे सांगताना जर भारत सुरक्षित नसता तर मी इथे राहिलेच नसते असंही म्हटलं आहे. पिंकव्हिला या वेबसाईटशी बोलताना सनीने इनटॉलरन्स किंवा असहिष्णूता हा शब्द वापरणं इटरेस्टिंग असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे.
आपल्या स्वत:बद्दल बोलताना सनी म्हणते मला भारत आवडतो आणि इथं राहणं ही अतिशय सुखाची बाब आहे. जर इथं सुरक्षित वातावरण नसतं तर मी इथे राहिलेच नसते असंही तिनं स्पष्ट केलं आहे.
ज्यावर प्रचंड वाद विवाद झाले त्या आमिर खानच्या विधानाबद्दल विचारले असता सनी म्हणाली की काहीवेळा लोकांची वाक्यं फिरवाफिरवी करून वापरली जातात. वेबसाईटवरचं ट्रॅफिक वाढावं म्हणून असे प्रकार केले जातात, आणि माझ्याबाबतीत तर असं रोजच घडतं असंही तिनं हसत हसत सांगितलं.

Web Title: India is tolerant - Sunny Leone