भारत सहिष्णू देश आहे - कतरिना कैफ
By Admin | Updated: February 7, 2016 13:59 IST2016-02-07T13:50:46+5:302016-02-07T13:59:23+5:30
भारतात असहिष्णूता असल्याचे नाकारत बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफेने बॉलिवुडमधल्या आपल्या सहकलाकारांच्या मताशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले.

भारत सहिष्णू देश आहे - कतरिना कैफ
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - भारतात असहिष्णूता असल्याचे नाकारत बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफेने बॉलिवुडमधल्या आपल्या सहकलाकारांच्या मताशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले.
मला असहिष्णूतेच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या वादविवादाची पूर्ण कल्पना नाही. पण माझ्या दुष्टीने भारत सहिष्णू आणि विशेष देश आहे. जेव्हा मी ब्रिटनवरुन भारतात आले तेव्हा मला घरी आल्यासारखे वाटले. इथे जी आत्मीयता, आपलेपणा आहे तो अन्यत्र कुठे जाणवला नाही. मला संपूर्ण आयुष्यभर इथे रहाण्याची इच्छा आहे असे कतरिनाने सांगितले.
काश्मीरची पार्श्वभूमी असलेल्या 'फितूर' या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना तिने हे मत व्यक्त केले. बॉलिवुडमधले आघाडीचे नायक आमिर खान, शाहरुख खान यांनी देशातल्या वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर बॉलिवुडमध्ये सहिष्णू-असहिष्णूतेच्या वादाला सुरुवात झाली होती.
बॉलिवुडमधील अभिनेते अनुपम खेर, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जाहीरपणे सरकारच्या समर्थनाची भूमिका घेत आमिर-शाहरुखच्या विधानावर टीका केली होती.