शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:45 IST

Amit Shah : देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम  राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

जोधपूर : भारत लवकरच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी एक व्यापक अँटी-ड्रोन युनिट तयार करणार आहे, कारण आगामी काळात मानवरहित ड्रोनचा धोका गंभीर होणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. बीएएसएफच्या (BSF) 60 व्या स्थापना दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेझर-सुसज्ज अँटी-ड्रोन गन-माउंट सिस्टमचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

या सिस्टममुळे पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन निष्क्रिय करणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या घटनांमध्ये 3 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. येत्या काळात ड्रोनचा धोका अधिक गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत संरक्षण आणि संशोधन संस्था व डीआरडीओ यांच्या सहकार्याने 'संपूर्ण सरकारी' दृष्टिकोनाने आम्ही या समस्येचा सामना करत आहोत. त्यामुळे आगामी काळात आम्ही देशासाठी सर्वसमावेशक अँटी ड्रोन युनिट तयार करणार आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.

पाकिस्तान (2,289 किमी) आणि बांगलादेश (4,096 किमी) सह भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सर्वसमावेशक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीवर (CIBMS) काम सुरू आहे. यासह, आसाममधील धुबरी (भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा) नदीच्या सीमेवर तैनात असलेल्या सीआयबीएमएसकडून आम्हाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे, परंतु काही सुधारणा आवश्यक आहेत. संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवर एक व्यापक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे, ती पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर लागू केली जाईल, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, मोदी सरकार व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामद्वारे उत्तर सीमावर्ती गावांमध्ये कनेक्टिव्हिटी, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा सुधारत आहे, ज्यामुळे स्थलांतर थांबत आहे. देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम  राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, सीमा सुरक्षा वाढवणे आणि 48,000 कोटी रुपयांचा निधी वाटप करून या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी काम करणे ही मोदी सरकारची सर्वात मोठी योजना आहे. सुमारे तीन हजार गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येत आहे, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, केंद्र सरकारने भारताच्या सीमेवर कुंपण, रस्ते आणि इतर गोष्टींसाठी मोठा अर्थसंकल्प मंजूर केला आहे, असेही अमित शाह यांनी सांगतिले.

260 हून अधिक ड्रोन केले निष्क्रियअधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 260 हून अधिक ड्रोन भारत-पाकिस्तानच्या सीमेवरून पाडण्यात आले किंवा जप्त करण्यात आले, तर 2023 मध्ये ही संख्या जवळपास 110 होती. शस्त्रे आणि ड्रग्ज वाहून नेणाऱ्या ड्रोनला रोखण्याच्या सर्वाधिक घटना पंजाबमध्ये घडल्या आहेत, तर राजस्थान आणि जम्मूमध्ये फारच कमी आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBSFसीमा सुरक्षा दलRajasthanराजस्थान