शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवरील पाकसोबतचा व्यापार बंद, केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:13 IST

१९ एप्रिलपासून नियंत्रण रेषेवर सुरु असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत

नवी दिल्ली - १९ एप्रिलपासून नियंत्रण रेषेवर सुरु असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. जम्मू काश्मीरच्या एलओसीवर व्यापारी मार्गातून पाकिस्तान गैरवापर करत असल्याचं अहवाल आल्यानंतर केंद्राने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानकडून अवैधरीत्या हत्यारे, अमली पदार्थ आणि बनावट नोटा भारतात आणण्याला चाप बसणार आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश गुरुवारी जारी केले. येत्या १९ एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून हा नियंत्रण रेषेवरुन सुरु असलेला व्यापार बंद करण्यात येणार आहे. या व्यापाराच्या माध्यमातून पाकिस्तान अवैधरीत्या बनावट नोटा, हत्यारं, अमली पदार्थ भारतात पाठवत होतं. गुप्तचर यंत्रणेकडून अशाप्रकारचा अहवाल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाला प्राप्त झाला. त्यानंतर हा आदेश भारत सरकारकडून घेण्यात आला आहे. 

भारत व पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव असला तरी त्याचा दोन देशांतील व्यापारावर अजिबात परिणाम झाला नव्हता. भारतातून रोज ३४ ट्रक पाकिस्तानला जात असतं तर पाकमधून १४ ट्रक भारतात येतात. भारत व पाकिस्तान यांच्यात पूंछ भागातील चाकण-दा-बाग येथून हा व्यापार चालतो. सामानांचे ट्रक नियंत्रण रेषा ओलांडून एकमेकांच्या देशात ये-जा करीत असतात. दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला तरीही हा व्यापार सुरूच राहतो. 

पाकिस्तानसोबत असलेला व्यापार बंद केल्यास त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याचा हाही उत्तम मार्ग ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या भाषेत सांगायचे तर, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानला आपल्या सर्व अटी दूर सारून चर्चेला बसवण्यास भाग पाडणे आणि पाकिस्तानची वाटाघाटींची शक्ती काढून घेणे ही भारताच्या चाणक्यांची नीती असावी.पाकिस्तानमध्ये विशेष विदेशी गुंतवणूक येत नाही. पाकिस्तानातील अशी गुंतवणूक केवळ २५००-३००० दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. खुद्द पाकिस्तानचे उद्योजक अंतर्गत अव्यवस्थेमुळे बांगलादेशात गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात. त्यामुळे भारताने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान