शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:53 IST

१९४० नंतर पहिल्यांदाच 'हा' आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...

भारताने २०२४ मध्ये पवन ऊर्जा आणि सौर उर्जेपासून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत जर्मनीलाही मागे टाकत, एक मोठी झेप घेतली आहे. आता भारत या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. एका अहवालानुसार, भारताने जागतिक पातळीवर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून १५% वीजेची निर्मिती केली आहे. भारतात कमी कार्बन स्रोतांपासून (जसे की अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जा) 40.9% विजेची निर्मिती झाली आहे. १९४० नंतर पहिल्यांदाच हा आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

आता पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. या बाबतीत भारताने २०२४ मध्ये जर्मनीलाही मागे टाकले आहे. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या जगातील एकूण विजेपैकी १५% वीज एकट्या भारताने तयार केली.

भारताची जोरदार कामगिरी - भारतात स्वच्छ स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेपैकी ८% जलविद्युत आणि १०% पवन आणि सौरऊर्जेपासून तयार झाली. २०२४ मध्ये जगभरात ८५८ टेरावॅट एवढ्या स्वच्छ ऊर्जेची भर पडली. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत ४९% अधिक आहे. भारतात २०२४ मध्ये निर्माण झालेल्या एकूण वीजेपैकी ७% वीज सौर ऊर्जेपासून निर्माण झाली. २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. याच बरोबर, भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौरऊर्जा बाजार बनला आहे.

यासंदर्भात बोलताना एम्बरचे व्यवस्थापकीय संचालक फिल मॅकडोनाल्ड म्हणाले, "बॅटरी स्टोरेजसह सौरऊर्जा ही जागतिक ऊर्जा बदलाचा केंद्रबिंदू बनली आहे." या अहवालात ८८ देशांचा समावेश आहे. हे देश जगातील ९३% वीज मागणी पूर्ण करतात.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाGermanyजर्मनी