शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू सिंगची 'भक्ती', स्टार खेळाडूनं बांधलं देवीचं मंदीर; लाखोंचा खर्च अन् 'यशा'साठी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 13:59 IST

आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर रिंकूने सामाजिक बांधिलकी जपताना लाखो रूपयांचे मंदीर बांधले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॅट भेट दिली. अनेक युवा शिलेदारांना आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात टीम इंडियाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आयपीएल स्टार रिंकू सिंग देखील भारतीय संघाचा सदस्य होता. मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील असलेला रिंकू आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून प्रसिद्धीच्या झोतात आला. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात रिंकूने एकाच षटकात पाच षटकार खेचून इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर रिंकूने सामाजिक बांधिलकी जपताना लाखो रूपयांचे मंदीर बांधले आहे. 

आशियाई स्पर्धेत यंदा भारताने विक्रमी पदके जिंकताना पदकांचे शतक झळकावले. इतिहासात प्रथमच भारताला १०७ पदके जिंकता आली. या आधी भारतीय शिलेदारांनी २०१८ मध्ये सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. पण, यंदाच्या पर्वात हा विक्रम मोडीत निघाला. आशियाई स्पर्धेत अलिगढ येथील दोन खेळाडू सहभागी झाले होते. रिंकू सिंग आणि कांस्य पदक विजेत्या गुलीवर सिंगने मोठ्या व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. मंगळवारी आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली बॅट पंतप्रधानांना भेट दिली. यावेळी सर्व खेळाडू उपस्थित होते.  

रिंकूने मंदिराला दिले ११ लाख  उत्तर प्रदेशातील अलीगढच्या रिंकू सिंगने जिल्ह्यातील कमलपूर गावात कुलदेवी माँ चौदेरे देवीचे मंदिर बांधले आहे. रिंकूचा भाऊ सोनू सिंगने सांगितले की, मंदीर सुमारे ११ लाख रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. तसेच रिंकूला भविष्यात देखील असेच यश मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. याशिवाय या मंदिरात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी मूर्तीचा अभिषेक केला जाईल. पण या कार्यक्रमावेळी रिंकू तिथे नसेल. तो सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. दुलीप ट्रॉफी खेळल्यानंतर तो दिवाळीच्या मुहूर्तावर अलिगढला परतणार आहे, असेही रिंकूच्या भावाने सांगितले. 

टॅग्स :Rinku Singhरिंकू सिंगTempleमंदिरAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३