शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:01 IST

भाजपचे टीकास्त्र, काँग्रेस वक्तव्याशी असहमत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्यव्ये गाजत असताना मणिशंकर अय्यर यांनी भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहे हे आपण विसरता कामा नये, कोणी माथेफिरू सत्तेवर आला तर तो आपल्याविरुद्ध वापरू शकतो, अशी प्रतिक्रिया दिलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, भाजपने त्यावर टीका केली आहे. अय्यर यांच्या वक्तव्याशी पक्ष असहमत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.  एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहेअय्यर म्हणाले, पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे, या कारणाखाली केंद्र सरकार पाकिस्तानशी चर्चा करणार नाही असे म्हणते, हे मला समजत नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भारत अहंकारातून आपल्याला जगात हिणवत आहे, असे पाकिस्तानला वाटेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील एखादा सत्ताधारी माथेफिरू हा बॉम्ब भारताविरुद्धवापरू शकतो. 

प्रचार मोहीम फसल्याने जुने व्हिडीओ काढत आहेतपाकिस्तानबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ जुना आहे आणि भाजपचा लोकसभेचा प्रचार फसल्यामुळे ते जुने व्हिडीओ काढत आहेत. व्हिडीओत मी घातलेल्या स्वेटरवरून हे स्पष्ट आहे की माझी टिपणी अनेक महिन्यांपूर्वी हिवाळ्यातली होती. भाजपच्या या खेळात मी पडणार नाही.- मणिशंकर अय्यर, काँग्रेस नेते

जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्नजनतेचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी भाजपने अय्यर यांचा जुना व्हिडीओ व्हायरल केला. व्हिडीओत अय्यर कोणत्याही अधिकारांतर्गत पक्षाची भूमिका मांडत नव्हते. काही महिन्यांपूर्वी अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याशी काँग्रेस पूर्णपणे असहमत आहे. - पवन खेडा, काँग्रेस               प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष

ही विचारसरणी काँग्रेसचीहे तेच मणिशंकर अय्यर आहेत जे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. २६/११ पुलवामा हल्ल्यांबाबत अनेक काँग्रेस नेते पाकला क्लीन चिट देत आहेत. त्यांच्यासाठी दहशतवाद्यांना पाठवणारा आदरणीय आहे, तर भारतीय लष्कर हे रस्त्यावरील गुंड आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे नेतेही पाकिस्तानबद्दल आदर दाखवत आहेत. ही विचारसरणी केवळ मणिशंकर अय्यर यांची नाही, तर संपूर्ण काँग्रेसची आहे. सध्याच्या निवडणुकांमध्ये व्होट बँकेसाठी हा एक प्रयोग आहे.- शेहजाद पूनावाला, प्रवक्ते, भाजप

काँग्रेस पाकविरुद्ध मवाळभारताने पाकला घाबरावे आणि त्याचा आदर करावा, अशी अय्यर यांची इच्छा असल्याचे दिसते. परंतु नवा भारत कोणालाही घाबरत नाही. अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे हेतू, धोरणे आणि वैचारिकता उघड झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाकिस्तान आणि त्यांच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादापुढे शरणागती पत्करली आहे. - राजीव चंद्रशेखर, केंद्रीय मंत्री

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPakistanपाकिस्तान