हिंदी महासागरातल्या चीनच्या वाढत्या घुसखोरीनं भारताला धोका- नौदल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 08:01 AM2019-07-26T08:01:20+5:302019-07-26T08:03:04+5:30

गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे.

india respond overgrowing china footprint into indian ocean region says navy chief karambir singh | हिंदी महासागरातल्या चीनच्या वाढत्या घुसखोरीनं भारताला धोका- नौदल प्रमुख

हिंदी महासागरातल्या चीनच्या वाढत्या घुसखोरीनं भारताला धोका- नौदल प्रमुख

Next

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी चीनबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय लष्कराला चीनला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) इतर विभागांत मोठ्या प्रमाणात नौदलाचं साहित्य पाठवत आहे. त्यावर भारताला नजर ठेवणे आवश्यक आहे. चीनच्या मंत्रालयानं सैन्याच्या विकासासाठी नव्या युगातील चीनची राष्ट्रीय सुरक्षा या मथळ्याखाली एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. यात वर्ष 2012 ते 2017पर्यंत चीनच्या संरक्षण क्षेत्रातील खर्चात सरासरी 9.42 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे.

आफ्रिकेच्या हॉर्नमधल्या जिबुतीमध्ये ओव्हरसीज बेस स्थापण करणं आणि कराचीमधल्या नौसैनिकांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबरोबरच चीनच्या हिंदी महासागरात होत असलेल्या घुसखोरीला नजरअंदाज करणं भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. चीननं या हिंदी महासागरालगतच्या क्षेत्रात सहा ते आठ युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे भारतानं सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्याला चीनच्या हालचालींवर अतिशय काळजीपूर्वक नजर ठेवावी लागणार आहे. चीननं काढलेली फक्त श्वेतपत्रिका नसून ग्लोबल पॉवर बनण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल आहे. त्यामुळेच ते नौसेनेला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा करत आहेत. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या बजेटमधून त्याला उत्तर देता येऊ शकतं का हे पाहणं गरजेचं आहे.  

  • नौसेनेला मोठ्या प्रमाणात निधी पुरवणं गरजेचं

नौदलाला सक्षण करण्यासाठी मोठ्या निधीच्या तरतुदीची गरज आहे. यावेळी नौदल प्रमुखांनी इतर आधुनिकीकरण योजनांसह स्वदेशी विमानवाहू युद्धनौकांचीही माहिती दिली. भारतानंसुद्धा 65,000 टन वजनाची युद्धनौका तयार केली आहे. कॅटोबार (सीएटीओबीएआर) ही एक अशी प्रणाली आहे, जिचा वापर एअरक्राफ्ट करियरमधल्या विमानाच्या वापरासंबंधी होतो. सध्या भारताकडे 140 युद्धनौका आणि 220 एअरक्राफ्ट आहेत. परंतु यात निवृत्त होणाऱ्या अनेक युद्धनौका आहेत. नौसेनेजवळ 2030पर्यंत 212 युद्धनौका आणि 458 एअरक्राफ्ट असणं गरजेचं असल्यानं मोठ्या निधीची तरतूद करणं आवश्यक असल्याचंही नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह म्हणाले आहेत. 

Web Title: india respond overgrowing china footprint into indian ocean region says navy chief karambir singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.