india reports 12584 new corona cases and 18385 discharges in last 24 hours | CoronaVirus Update गेल्या ६ महिन्यांनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

CoronaVirus Update गेल्या ६ महिन्यांनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत १२ हजार ५८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंददेशात १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर १८ हजार ३८५ जण कोरोनामुक्तकोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्के, तर मृत्युदर १.४४ टक्के

नवी दिल्ली : कोरोना संकट नियंत्रणात येत नसले, तरी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ५८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने दगावणाऱ्यांचा आकडा ०१ लाख ५१ हजार ३२७ वर पोहोचला आहे. तर, देशात १२ हजार ५८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आतापर्यंत देशाभरातील कोरोना रुग्णांची संख्या ०१ कोटी ०४ लाख ७९ हजार १७९ वर पोहोचली आहे. 

गेल्या २४ तासांत देशभरात १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांचा एकूण आकडा ०१ कोटी ०१ लाख ११ हजार २९४ वर पोहोचला आहे. गेल्या १८ दिवसांत देशभरात ३०० हून कमी रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर पोहोचला असून, मृत्युदर १.४४ टक्क्यांवर आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार असून, सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोना लसीचा पुरवठा करण्यास आजपासून (मंगळवार) सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लसीची पहिली खेप रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना लसीचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: india reports 12584 new corona cases and 18385 discharges in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.