शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

Corona Vaccine : लसीकरणाला गती मिळणार, रशियाची Sputnik V लस 1 मे रोजी भारतात पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 12:35 IST

Sputnik V : भारतात आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे.

ठळक मुद्देस्पुटनिक व्ही भारतात वापरली जाणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे.

नवी दिल्ली :  भारतात कोरोना लसीकरण मोहिमेचा नवीन टप्पा सुरु होणार आहे. या लसीकरण मोहिमेला आणखीन गती मिळणार आहे. कारण, भारतात आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीची पहिली तुकडी भारतात 1 मे राजी मिळणार आहे. याबाबतची माहिती रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिक यांनी दिली आहे. (india to receive first batch of russia's covid 19 vaccine sputnik v on may 1)

किरील दिमित्रिक म्हणाले की, पहिला डोस 1 मे रोजी भारतात येईल. रशियाकडून मिळणाऱ्या या लसींमुळे भारतातील कोरोनावर मात करण्यास मदत मिळेल, अशी शक्यता किरील दिमित्रिक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आरडीआयएफने 5 मोठ्या भारतीय औषध उत्पादक कंपन्यांसोबत वर्षाला 85 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. तसेच,  लवकरच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दरमहा 5 कोटी डोसचे उत्पादन करण्याचा अंदाज आहे, त्यानंतर येणाऱ्या काळात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

('केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका )

विशेष म्हणजे, स्पुटनिक व्ही भारतात वापरली जाणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सध्या भारतात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेल्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

(CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता)

देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या किंचित घसरलीगेल्या 24 तासांत देशात 3,23,144 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही काहीसा घसरून 2771 झाला आहे. आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 32,555 ने वाढले आहे. दिवसभरात 2,51,827 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आजवर 1,76,36,307 कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 1,45,56,209 बरे झाले आहेत. तर 1,97,894 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 28,82,204  रुग्ण उपचार घेत असून 14,52,71,186 लसीकरण झाले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसrussiaरशियाIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या