India Air Strike on Pakistan: भारतात नागरिकांना युद्धसज्जतेचे आदेश देत भारतीय संरक्षण दलांनी मिळून पाकिस्तानवर हल्ले चढविले आहेत. रात्री दोनच्या सुमारास भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळपास सहा ठिकाणी मिसाईलचा जोरदार वर्षाव केला आहे. पाकिस्तानने याची माहिती दिली आहे.
पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले आहे. पाक सैन्याने सांगितले की, ६ ठिकाणी २४ हल्ले करण्यात आले. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत.
या ९ ठिकाणांवर हल्ले...भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओके मध्ये या 9 ठिकानांवर हल्ले केले आहेत. 1. बहावलपूर,2. मुरीदके,३. गुलपुर,४. भीमबर,5. चकअमरू6. बाग,7. कोटली,8. सियालकोट9. मुजफ्फराबाद