नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानभारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स, लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन केले आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने अचूक हल्ले केले, त्याला विरोध म्हणून पाकने सायबर मोहीम हाती घेतल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. 'डान्स ऑफ द हिलरी' नावाचा सायबर व्हायरस व्हिडिओ, डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून पसरवला जात आहे. मोबाईल किंवा ईमेलवर आलेल्या अज्ञात लिंकवर क्लिक केल्यास हा व्हायरल गंभीर नुकसान पोहचवू शकतो. त्यात हॅकर्सना तुमच्या बँक क्रेडेन्शियल्ससह अनेक गोपनीय माहिती मिळू शकते.
कोणत्या फाईल्स धोकादायक?
- Dance of the Hillary नावाने कुठलीही फाईल अथवा व्हिडिओ लिंक आल्यास क्लिक करू नका
- .exe फॉर्मेटमध्ये आलेली अज्ञात लिंक्स
- tasksche.exe नावाची फाईल्स
- कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळावे
काय होऊ शकते नुकसान?
- तुमचे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे लीक होऊ शकतात
- बँकिंग APP मधून पैसे चोरीला जाऊ शकतात
- तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो
- डिव्हाइसचा कॅमेरा आणि माइक रिमोटली चालू केला जाऊ शकतो
दरम्यान, हा व्हायरस संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंट फाईल्सद्वारे येतो. गुप्तचर यंत्रणेने भारतीयांना कोणत्याही अज्ञात फाईल्सवर क्लिक करणे, डॉक्युमेंट्स उघडणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे. या सायबर हल्ल्यामागे पाकिस्तानची आयएसआय आणि सायबर विंग असल्याचा संशय भारतीय गुप्तचर संस्थांना आहे. या हल्ल्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे, लष्करी प्रतिहल्ल्यांपासून लक्ष विचलित करणे, नागरिकांचा डेटा चोरणे आणि त्यांना ब्लॅकमेल करणे आणि भविष्यासाठी लक्ष्य करणे आहे.
इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
पाकिस्तानने भारतातील १५ ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तेथील लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, छोर, कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या साहाय्याने अत्यंत भेदक हल्ले गुरुवारी केले. पाकिस्तानकडून भारतातील शहरांवर ड्रोन हल्ले सुरू असताना त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी छावण्या नष्ट केल्या. पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल निष्क्रिय केले.