शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 14:43 IST

India-Pakistan Tension : झेलम नदीवरील किशनगंगा धरणाबाबतही असाच निर्णय घेतला जाऊ शकतो.

India-Pakistan Tension : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा 65 वर्षे जुना सिंधू करार रद्द करणे, हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने उचललेले हे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे. दरम्यान, आता भारताने पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला आहे.  झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

किशनगंगेचे पाणी थांबवले जाणार?मीडिया रिपोर्सनुसार, भारत जम्मूतील रामबन येथील बगलिहार जलविद्युत धरण आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणाद्वारे आपल्या बाजूने पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करू शकतो. याचा अर्थ असा की, या धरणांद्वारे पाकिस्तानला जाणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थांबवता येते किंवा प्रवाह वाढवता येतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दशकांपूर्वीचा हा करार स्थगित केला आहे.

1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला. याअंतर्गत, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये विभागण्याचा निर्णय घेण्यात आला. बागलिहार धरण हा देखील दोन्ही शेजारी देशांमधील दीर्घकाळापासूनचा वादाचा विषय आहे. पाकिस्तानने यापूर्वी या प्रकरणात जागतिक बँकेकडून मध्यस्थीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, किशनगंगा धरणाचाही वाद आहे. 

सिंधू प्रणाली पाकिस्तानसाठी का महत्त्वाची ?करारानुसार, पाकिस्तानला सिंधू प्रणालीच्या पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, चिनाब आणि झेलम) नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे 93% पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो. पाकिस्तानची सुमारे 80% शेती जमीन याच पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका महत्त्वाची आहे. हेच कारण आहे की, करार पुढे रद्द केल्यामुळे पाकिस्तान सतत युद्धाच्या धमक्या देत आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर