शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan: पाकिस्तानात कसं कोसळलं भारताचं 'सुपरसोनिक मिसाईल'? केंद्रानं दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:55 IST

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे."

भारतानेपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहरात 9 मार्च रोजी पडलेल्या मिसाईलच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एका निवेदनात केंद्राने म्हटले आहे की, "9 मार्च 2022 रोजी, नियमित देखभालीदरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अचानक फायर झाले. भारत सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत."

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे. तत्पूर्वी गुरुवारी, भारताकडून एक मिसाईल आपल्या हद्दीत आले, असा दावा पाकिस्तानी सशस्त्र दलांनी केला होता.

यासंदर्भात, पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते की, त्यांनी भारतीय हवाई क्षेत्रातून पाकच्या हद्दीत येणाऱ्या मिसाईलचा शोध घेतला. ते पंजाब प्रांतात पडले आहे. तसेच, 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी वेगवान मिसाईल भारतीय हद्दीतून पाकिस्तानमध्ये घुसले आणि पंजाब प्रांतात कोसळले, असे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.

मेजर जनरल इफ्तिखार यांनी म्हटले आहे की, संबंधित मिसाईल बुधवारी रात्री पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यात मियां चन्नू परिसरात कोसळली. ती जमिनीवरून सोडली गेली होती. याची माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलाने शोध मोहीम सुरू केली होती. या मिसाईलमुळे मोठी दुर्घटनाही होऊ शकली असती, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान