शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:29 IST

India Pakistan Conflict: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते  ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

पहलागामधील हल्ला आणि भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते  ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत माहिती देताना सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतामधील ३६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासामध्ये या हल्ल्यासाठी तुर्कीमध्ये तयार झालेल्या ड्रोनचा वापर केला गेला असल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने याला तत्काळ प्रत्युत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला केला. यामध्ये पाकिस्तानची सर्व्हिलान्स रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट झाली, भारताने केलेल्या या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी अभियानासाठी हा एक मोठा धक्का आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली नव्हती. उलट तिचा ढालीसारखा वापर केला. त्यावेळी कराची आणि लाहोरसारख्या शहरांवरून प्रवासी विमाने जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले  होते. मात्र सर्वसामान्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी ही संपूर्ण कारवाई संयमीपणे हाताळली. आता या संयमी भूमिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही कौतुक होत आहे.

त्याबरोबरच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. घुसखोरीचेही प्रयत्न झाले, तंगधार, उरी आणि उधमपूरमध्य मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यादरम्यान, भारताच्या हवाई दलानेही बऱ्यापैकी संयम बाळगला, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान