शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:29 IST

India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने नागरी वस्त्या आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्याने भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यादरम्यान, भारतीय नौदलही अरबी समुद्रामध्ये मोठ्या ताफ्यासह कराचीला लक्ष्य करण्यासाठी सज्ज होते, अशी माहिती आता समोर आली आहे. 

भारतीय सैन्यदलांनी दहशतवाद्यांना लक्ष्य करत राबवेल्या या मोहिमेदरम्यान, भारतीय नौदलाने कराचीजवळील अरबी समुद्रात ३६ युद्धनौकांची तैनाती केली होती. त्यात विमानवाहू नौका विक्रांतसह ७ फ्रिगेट, ७ पाणबुड्या आणि विनाशिकांचा समावेश होता. या तैनातीमधून भारतीय नौदलाने आपल्या आरमारी शक्तीचं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तसेच पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं.

एप्रिल महिन्यात २२ तारखेला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात  कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भीषण हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारताच्या तिन्ही सेनादलांनी एकत्रित कारवाई करत पाकिस्तानला जेरीस आणले होते.

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आणि कुठल्याही हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल याची जाणीव पाकिस्तानला करून देणे हा ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेसाठी भारताने कराचीजवळ अरबी समुद्रामध्ये युद्धनौकांची जबरदस्त तैनाती केली होती. या तैनातीमुळे अखेरीस पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian navyभारतीय नौदलIndiaभारतPakistanपाकिस्तान