शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:12 IST

दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल.

मुंबई: भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकत्र आले तर ती जगातील मोठी ताकद असेल, असे मत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मांडले. भारद्वाज यांनी कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पीआयएफएफ) हजेरी लावली होती. त्यानंतर 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या नातेसंबंधावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला पाकिस्तान हा देश खूप आवडतो. प्रत्येकवेळी या देशाने मला प्रेमच दिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सुधारायचे असतील तर सांस्कृतिक आदानप्रदान महत्त्वाचे आहे. अधिकाअधिक सांस्कृतिक उपक्रमांद्वारे दोन्ही देशांतील दरी भरू काढता येईल. परंतु, दुर्दैवाने हे दोन्ही देश कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असतात. मुळात, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक बाबतींमध्ये साम्य आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल, असे भारद्वाज यांनी म्हटले. साधारणत: दोन देशांमधील संबंध सुधारायचे असल्यास संस्कृती आणि राजकारण हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र, भारत व पाकिस्तानच्याबाबतीत राजकीय पर्याय सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान हा एकमेव दुवा उरला आहे. परंतु, सध्याच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधांचेही नुकसान होत आहे. त्यासाठी दोन्ही बाजुंकडून सहिष्णुता आणि स्वीकारर्हतेचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. मात्र, हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तसे प्रयत्नही झाले पाहिजेत, असे विशाल भारद्वाज यांनी सांगितले.  

टॅग्स :Vishal Bhardwajविशाल भारद्वाजIndiaभारतPakistanपाकिस्तान