शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"नोटांवरही 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' लिहिलंय, तिसरी नोटाबंदी होईल असं वाटतंय", आपचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 09:45 IST

आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली :  जी-२० देशांची बैठक आणि मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, जी-२० साठी ज्या नेत्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

मोदी सरकार आता तिसरी नोटबंदी करेल, कारण आपल्या चलनी नोटा आहेत, त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते नोटांवरुनही इंडिया हटवतील आणि लोकांना पुन्हा नोटा बँकांमध्ये जमा करायला लावतील, असं संजय सिंह म्हणाले आहेत. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनाही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला. 

आप खासदार संजय सिंह म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून एक वाद निर्माण केला जात आहे. भाजप (BJP) आणि मोदी सरकारला राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकायचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. याची सुरुवात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केली होती. 'इंडिया' हा शब्द काढून टाकला पाहिजे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर घटनेतूनच 'इंडिया' हा शब्द काढून टाकावा, अशा बातम्या मोदी सरकार प्रायोजित करत आहेत."

"बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का करता?"आप खासदार संजय सिंह पुढे म्हणाले की, "मला त्यांना सांगायचं आहे की, ते बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का करतात? आरएसएस आणि भाजपमध्ये अशी निराशा आहे की, त्यांच्याशी संबंधित कोणीही विचारवंत बनलं नाही. त्यांना काहीही लिहिता आलं नाही, त्यामुळेच बाबासाहेबांचं लिखाण कसं काढायचं असा विचार ते सातत्यानं करत असतात. राज्यघटनेच्या पहिल्या कलमात म्हटलं आहे की, "इंडिया दैड इज भारत विल बी यूनियन ऑफ स्टेस्ट."

"आयआयएम, एम्स आणि इस्त्रो या सर्व नावांमध्ये इंडिया आहे"पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित आणि आदिवासींबद्दल द्वेष दाखवत असल्याचा आरोपही यावेळी बोलताना संजय सिंह यांनी केला. जोपर्यंत इंडिया आघाडीच्या युतीचा संबंध आहे, आम्ही लिहिले होते  'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'. त्यामुळे ते (मोदी सरकार) इंडिया हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आयआयएम, एम्स आणि इस्त्रो  या सर्व संस्थांच्या नावांमध्येही इंडिया आहे. हा मोदी सरकारचा नापाक हेतू आहे. आम्ही याला विरोध करू आणि ज्यांची बाबासाहेबांवर श्रद्धा आहे ते हे नक्कीच खपवून घेणार नाहीत, असंही ते म्हणाले.

टॅग्स :AAPआपNote BanनोटाबंदीIndiaभारत