शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

NRC: घुसखोरी करणाऱ्यांना देशात राहता येणार नाही; गडकरींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:14 IST

'मोदी सरकार धर्म, जाती आणि पंथावरुन कोणासोबतही भेदभाव करत नाही'

नवी दिल्ली: कोणताही देश अवैध घुसखोरी सहन करणार नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (NRC) भारतातील नागरिकांविरोधात नाही. त्यामुळे लोकांनी शांत राहावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. विरोधकांकडून देशवासीयांना भडकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कोणत्याही परदेशी व्यक्तीनं येऊन वास्तव्य करायला भारत म्हणजे धर्मशाळा नाही, असं देखील गडकरी म्हणाले. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यावर गडकरींनी भाष्य केलं. कोणताही देश अवैध घुसखोरी सहन करणार नाही. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार धर्म, जाती आणि पंथावरुन कोणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र काही पक्ष अल्पसंख्यांकांची दिशाभूल करुन त्यांना घाबरवण्याचं काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भारतातील जनतेला सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन लोकांची दिशाभूल करणारे पक्ष देशाच्या एकता आणि अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका गडकरींनी केली. यावेळी गडकरींनी हिंदुत्वाबद्दलदेखील त्यांचे विचार मांडले. हिंदुत्व म्हणजे पूजा-पद्धती नसून जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदू हा शब्द संकुचित नाही, असं गडकरी म्हणाले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNitin Gadkariनितीन गडकरी