शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 'या' शहरात सूर्यदेवाचा कोप, पहिल्यांदाच तापमानाचे अर्धशतक ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 20:53 IST

राजस्थानमध्ये यापूर्वी 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानमध्ये झाली असून सूर्यदेवाने चक्क तापमानाचे अर्धशतकच झळकावले आहे. भारतीय हवामान खात्याने राजस्थानमधील चुरू येथे 50.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. देशातील आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची ही नोंद करण्यात आली आहे. देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान 45 अंशांवर दाखल झाले आहे. राजधानी दिल्लीही तापली असून, कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. 

राजस्थानमध्ये यापूर्वी 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी शुक्रवारी (31 मे) 49.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. भारतीय हवामान खात्याने देशातील सर्वात तप्त दिवस या ठिकाणी नोंदवला गेला असल्याची माहिती दिली. श्री गंगानगर येथे याआधी 30 मे 1944 मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी 49.4 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर आता तब्बल 75 वर्षांनी पुन्हा एकदा राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मात्र, चुरु येथील तापमानाने श्री गंगानगर येथील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे; हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण आहे.

राजस्थानच्या बीकानेरमध्ये 46.6 अंश सेल्सिअस, जैसलमेरमध्ये 46.5 अंश सेल्सिअस, जोधपूर 44.7 अंश सेल्सिअस, कोटा 44.6 अंश सेल्सिअस, अजमेर 44.5  अंश सेल्सिअस, बाडमेर 44.5  अंश सेल्सिअस, जयपूर 44.2  अंश सेल्सिअस आणि उदयपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले आहेत. 

टॅग्स :TemperatureतापमानSun strokeउष्माघातRajasthanराजस्थान