भारताविरुद्ध पराभवाचा राग टिव्हीवर
By Admin | Updated: February 16, 2015 08:39 IST2015-02-16T06:03:00+5:302015-02-16T08:39:46+5:30
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये पाकिस्तानी संघ पराभूत झाल्याने येथील क्रिकेट रसिकांनी स्वतःच्या घरातील टिव्हीची मोडतोड केली, व खेळाडूंविरोधात घोषणा दिल्या.

भारताविरुद्ध पराभवाचा राग टिव्हीवर
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १५ - भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये पाकिस्तानी संघ पराभूत झाल्याने येथील क्रिकेट रसिकांनी स्वतःच्या घरातील टिव्हीची मोडतोड केली, व खेळाडूंविरोधात घोषणा दिल्या.
भारत -पाक क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील क्रिकेट शौकिनांसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यातच पाकिस्तानला १९९२ पासून ते २०११ पर्यंत भारताकडून सलग पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पाक क्रिकेट संघाची बदलती रणनीती लक्षात घेता क्रिकेट चाहत्यांना फार अपेक्षा होती. परंतू, भारतीय संघाने सलग सहावेळा म्हणजेच १९९२, १९९६, १९९९, २००३ व २०११ सालानंतर २०१५ मध्येही विश्वचषक सामन्यांत पाकिस्तानला धुळचारली. हा पराभव सहन न झाल्याने चिडलेल्या पाकिस्तानी क्रिकेट रसिकांनी, वांग्याचं तेल वड्यावर काढणे या म्हणीप्रमाणे स्वतःच्या घरातील टिव्हीसंच रस्त्यावर आणून क्रिकेटच्या बॅटने पूर्णतः तोडले. फक्त टिव्हीसंच तोडून येथील नागरिकांचा राग शांत झाला नसून त्यांनी खेळाडूंविरोधात अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी केली. यापूर्वीही भारताविरुद्धचे क्रिकेट सामने पराभूत होऊन आल्यावर पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंना येथील क्रिकेट रसिकांचा राग सहन करावा लागला आहे.