शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जुलै अखेरपर्यंत भारतात दररोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 22:48 IST

Coronavirus vaccination : लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारताला लसींचं उत्पादन वाढवावं लागेल, गुलेरिया यांचं वक्तव्य

ठळक मुद्देलसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारताला लसींचं उत्पादन वाढवावं लागेल, गुलेरिया यांचं वक्तव्यपरदेशातून लसींच्या खरेदीसाठी धोरण आखण्याची आवश्यकता : गुलेरिया

भारताला आपल्या लसीकरणाचं व्यापक लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं उत्पादन वाढवावं लागेल, असं मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं. याशिवाय भारताला परदेशातून लसी खरेदी करण्यासाठी एक व्यापक धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचंही गुलेरिया म्हणाले. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला होता. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गुलेरिया यांनी अनेक प्राधिकरणांऐवजी एकाच प्राधिकरणाशी व्यवहार करण्यास उत्पादकांचे प्राधान्य असल्याचे सांगून लस खरेदीसाठी 'समग्र तोडगा' काढण्यावर भर दिला. एनडीटीव्ही इंडियाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यापूर्वी दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यांना परदेशातील कंपन्यांनी थेट लसी पुरवण्यास नकार दिला होता. यासंदर्भात त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी केवळ केंद्र सरकारसोबत चर्चा करण्याचा आपल्या धोरणाचा हवाला दिला. गर्भवती महिलांचं लवकर लसीकरण व्हावं"गर्भवती महिलांमध्ये आजार आणि मृत्यू दराचं प्रमाण अधिक असतं, म्हणून त्यांना लवकरात लवकर लसीकरण करायला हवं," असं गर्भवती महिलांच्या लसीकरण अभियानाबाबत बोलताना गुलेरिया म्हणाले. "जागतिक आकडेवारीनुसार गर्भवती महिलांवरील लसींचे फायदे त्यांच्या नकारात्मक परिणामापेक्षा जास्त आहेत. कोवॅक्सिन ही लस निष्क्रीय विषाणूपासून तयार करण्यात आलेली आहे. तसंच ती फ्लूच्या लसीप्रमाणे आहे. या प्रकार गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असायला हवा," असंही त्यांनी नमूद केलं. मल्टीविटामिन आणि झिंक प्रतिकारशक्ती बूस्टरच्या वापराविषयी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देताना एम्सच्या प्रमुखांनी सांगितले की, "त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, तरीही ते मोठ्या कालावधीसाठी घेऊ नये. त्याऐवजी लोकांनी उत्तम अन्न आणि हे घटक असलेला आहार घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAIIMS hospitalएम्स रुग्णालयGovernmentसरकारIndiaभारत