शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अरर्र...अन्नपदार्थांच्या नासाडीत भारत जगात दुसरा; प्रत्येक व्यक्तीकडून दरवर्षी ५० किलो अन्न वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:30 IST

प्रत्येक व्यक्तीकडून दरवर्षी ५० किलो अन्न वाया

नवी दिल्ली : अन्नधान्याची नासाडी करण्यात जगात चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी ९० हजार कोटी रुपये किमतीच्या ६.८ कोटी टन अन्नपदार्थांचीभारतात नासाडी होते. याचा अर्थ देशातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी ५० किलो अन्न वाया घालविते. इतक्या पैशांत शीतगृह व फूड चेनची व्यवस्था झाली तर भारतातील एकाही व्यक्तीची उपासमार होणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.  

चीनमध्ये दरवर्षी ९.१ कोटी टन अन्नधान्याची नासाडी होते. याबाबत भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या स्थानी असलेल्या नायजेरियात ३.७ कोटी टन, त्या पाठोपाठ अमेरिकेत २ कोटी टन व इंडोनेशियात १.९ कोटी टन अन्नधान्याची बरबादी होते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या २०२१ च्या अहवालानुसार भारतामध्ये दरवर्षी ४० टक्के अन्न विवाह तसेच घरगुती समारंभ, धान्य पुरवठ्यातील त्रुटी व अव्यवस्थेमुळे वाया जाते. देशात प्रत्येक घराच्या किचनमधून अन्नधान्य, पदार्थांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. हे टाळे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)

मुंबईत रोज ६९ लाख किलो अन्न कचऱ्यात

भारतात २१०० कोटी किलो गहू दरवर्षी खराब होतो. नेमके इतक्याच गव्हाचे उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये होते. मुंबईमध्ये दरदिवशी ६९ लाख किलो अन्नपदार्थ कचरापेट्यांमध्ये फेकले जातात. इतक्या प्रमाणातील खाद्य पदार्थांत अर्ध्या मुंबईचे पोट व्यवस्थित भरू शकेल.

जगात ६९ कोटी लोक अर्धपाेटी

जगभरात दरवर्षी २.६ ट्रिलियन डॉलर इतक्या किमतीचे ९३ कोटी टन अन्न दरवर्षी वाया जाते. जगभरात ६९ कोटी लोक दररोज अर्धपाेटी असतात. २०३० पर्यंत ही संख्या ८४ कोटी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :foodअन्नIndiaभारत