शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला नवा धक्का देण्याच्या तयारीत भारत, चार दशकांनंतर पुन्हा सुरू होणार 'या' प्रकल्पाचं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 01:38 IST

झेलम नदीच्या पाण्याची साठवणूक आणि प्रवाह नियंत्रित करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे... या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यानंतर, पाण्याचे योग्य नियोजन होऊन स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी वाढतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तान संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडलेले आहेत. पाकिस्तानवरील कारवाईनंतर, मानवता आणि शांततेच्या दृष्टीने भारत ज्या 'सिंधू जल करारा'चे पालन करत आला होता, तो करार रद्द कपण्यात आला. "हा करार शांततेच्या दृष्टीने होता. मात्र, पाकिस्तानला शांतताच नको असेल, तर हा करारही अस्तित्वात राहणार नाही," अशा स्पष्ट शब्दांत केंद्र सरकारने आपली भूमिका मांडलेली आहे. यानंतर आता, जम्मू-काश्मीर सरकार चार दशकांपासून बंद असलेले 'वुलर बॅरेज' प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करणार आहे. झेलम नदीच्या पाण्याची साठवणूक आणि प्रवाह नियंत्रित करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

भारत सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारने यापूर्वी सिंधू जल कराराचा सन्मान करत, हा प्रकल्प गुंडाळून ठेवला होता. मात्र, आता सिंधू जल करार निलंबित झाल्याने, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकार हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच यावर एकत्रितपणे काम सुरू करतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

वुलर बॅरेजची सद्यस्थिती -यासंदर्भात मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत माहिती दिली होती की, सरकार सध्या दोन मोठ्या प्रकल्पांवर केंद्रासोबत चर्चा करत आहे. यात, अखनूरमधील चिनाब नदीतून जम्मू शहरासाठी पाणीपुरवठा आणि झेलम नदीवरील 'तुलबुल' (वुलर बॅरेज) प्रकल्पाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी पूर्वी आशियाई बँकेकडून निधी मिळाला होता. मात्र सिंधू करारामुळे तो थांबवण्यात आला होता.

सध्या झेलम नदीच्या प्रवाहानुसार या तलावाचा आकार बदलत असतो. पाऊस आणि प्रवाहाच्या स्थितीनुसार या तलावाचा आकार किमान २० चौरस किलोमीटर ते कमाल १९० चौरस किलोमीटरपर्यंत बदलत असतो. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यानंतर, पाण्याचे योग्य नियोजन होऊन स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी वाढतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India to Restart Wular Barrage Project After Decades, Signaling Shift.

Web Summary : Amid strained relations, India considers restarting the Wular Barrage project in Jammu & Kashmir after decades. Aimed at regulating the Jhelum River's water flow, the project, previously halted due to the Indus Waters Treaty, gains renewed focus as the treaty faces potential changes. This could boost local employment.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर