अमेरिकेला ललकारने विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या तोंडी घालून एका खात्यावरून फेक पोस्ट करण्यात आली. तर दुसर्या एका खात्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिल्याची पोस्ट केली गेली. चुकीची माहिती पसरवणाऱ्या या दोन्ही अकाऊंट वापरकर्त्यांना एक्सने दणका दिला. ही दोन्ही खाती बंद करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पीआयबीने या दोन्ही खात्यावरून करण्यात आलेल्या पोस्टबद्दल माहिती दिली. या दोन्ही पोस्टमधील माहिती चुकीची आणि खोटा दावा करणारी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची मोडतोड करून विधाने प्रसिद्ध केल्याचे म्हटले.
दोन्ही खात्यावरून कोणत्या पोस्ट करण्यात आल्या?
मिडल ईस्टर्न अफेअर्स नावाच्या एक्स अकाऊंटवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या तोंडी चुकीचे विधान घालून पोस्ट केली गेली.
"आमची (भारताची) अर्थव्यवस्था व्हाईट हाऊसमधून चालणार नाही. रशियातून भारतात तेल आयात सुरूच राहील" असे चुकीचे विधान एस. जयशंकर यांच्या तोंडी घालून ही पोस्ट केली गेली.
डोनाल्ड ट्रम्प असे म्हणालेच नाहीत, फेक पोस्ट
चीन इन इग्लिश या खात्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा देणारे विधान केल्याबद्दलची पोस्ट केली गेली. "भारत रशियाकडून गॅस आयात करून आगीशी खेळत आहे. जर त्यांनी माघार घेतली नाही, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेला याची किंमत मोजावी लागेल", असे हे विधान ट्रम्प यांच्या तोंडी घालण्यात आले.
पीआयबी फॅक्ट चेककडून या दोन्ही पोस्ट खोट्या असल्याचे सांगण्यात आले. खोटा दावा करणाऱ्या आणि छेडछाड करून विधाने केलेली असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. एक्स कडून या दोन्ही खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही दोन्ही खाती बंद करण्यात आली आहेत.