शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 06:49 IST

‘आपला देश १४० कोटी लोकसंख्येशी झुंजतो आहे. आम्ही सर्व देशांतील लोकांना पोटात घेऊ शकत नाही. भारत धर्मशाळा नाही की, कुणीही यावे व येथे स्थायिक व्हावे,’ असे न्या. दत्ता म्हणाले. 

डाॅ . खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : भारत ही काही धर्मशाळा नाही की, साऱ्या जगातील निर्वासितांना येथे आसरा द्यावा, असे तीव्र निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.२०१५ मध्ये एक श्रीलंकन तामिळ व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याच वर्षी एलटीटीईशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याला अटक झाली. २०१८ मध्ये त्याला यूएपीएअंतर्गत दोषी ठरविण्यात येऊन १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. २०२२ मध्ये मद्रास हायकोर्टाने त्याची शिक्षा ७ वर्षांवर आणली; परंतु शिक्षा संपताच भारत सोडण्याचा आदेश दिला. देश सोडून जात नाही तोपर्यंत त्याला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेशही दिले.

श्रीलंकेत परत पाठवल्यास जिवाला होऊ शकतो धोकाश्रीलंकन तामिळीने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तो श्रीलंकेत परत गेल्यास त्याच्या जिवाला धोका आहे, कारण तो २००९च्या युद्धात एलटीटीईचा सदस्य होता. त्याच्या पत्नीला गंभीर आजार जडला असून त्याचा मुलगा जन्मतः हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याला दोन वर्षांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. यामुळे त्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले आहे.

१४० कोटी लोकसंख्येशी झुंजतोय...न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देताना, ‘आपला देश १४० कोटी लोकसंख्येशी झुंजतो आहे. आम्ही सर्व देशांतील लोकांना पोटात घेऊ शकत नाही. भारत धर्मशाळा नाही की, कुणीही यावे व येथे स्थायिक व्हावे,’ असे न्या. दत्ता म्हणाले. 

न्यायालय म्हणाले, भारतात स्थायिक होण्याचा घटनेच्या अनुच्छेद १९ नुसार अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. याचिकाकर्त्याच्या स्वातंत्र्यावरील आघात कायद्याच्या चौकटीत आहे, त्यामुळे अनुच्छेद २१चे उल्लंघन झाले नाही. कोर्टाने रोहिंग्यांच्या मुद्द्यावरही हीच भूमिका घेतली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय