इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सच्या प्रदर्शनाचा शुभारंभ
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:16+5:302015-01-23T23:06:16+5:30
(१०बाय३)

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सच्या प्रदर्शनाचा शुभारंभ
(१ ०बाय३)इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सच्या प्रदर्शनाचा शुभारंभनागपूर : प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन शुक्रवारपासून इन्स्टट्यिूूट ऑफ इंजिनिअर्समध्ये सुरू करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळे, हॉटेल्स, रिसॉर्टस् आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा, टूर ऑपरेटर्स संबंधीची सविस्तर माहिती मिळणार आहे. प्रदर्शन सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० दरम्यान खुले राहणार आहे. प्रदर्शनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाला चालना मिळणार आहे. आगामी काळात देशांतर्गत पर्यटन व्यवसायात नागपूर शहराची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे पर्यटनाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा प्रदर्शनामागील उद्देश आहे. आयआयटीतर्फे उन्हाळी सुट्यांसह इतर प्रसंंगांसाठी ग्राहकांपुढे पर्यटनाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. प्रदर्शनात ग्राहकांना कमी वेळात, कमी खर्चात पर्यटनाचा आनंद देण्यावर भर देण्यात येत आहे. प्रदर्शनात भारत सरकारच्या पर्यटन विभागासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, गुजरात पर्यटन महामंडळ, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळ, हिमाचल प्रदेश पर्यटन विभाग, आंध्रप्रदेश पर्यटन, केरळ पर्यटन विभाग सहभागी झाले आहेत. यासोबतच दुबई आणि थायलँड देशाचे पर्यटन विभाग आकर्षणाचे केंद्र आहेत. खाजगी क्षेत्रातील मेक माय ट्रीप, कॉक्स अँड किंग्ज, थॉमस कुक, महिंद्रा हॉलीडेज, जोकोन्स बीच रिसॉर्ट, गोवा या कंपन्यांच्या स्टॉल्समुळे प्रदर्शनाच्या विविधतेत भर पडली आहे. प्रदर्शनामुळे नागपूरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देश, विदेशातील पर्यटन स्थळांची माहिती मिळणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.