शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या कपटनीतीमुळे भारत सतर्क, लडाखपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर वाढवले लष्कर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:05 IST

एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.

ठळक मुद्देसद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेतचीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहेदोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत

नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले असताना दुसरीकडे भारत आणि चीनच्या सीमेवर सध्या प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांमध्ये सैनिकी पातळीवर चर्चा झाली असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.

सद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेत. त्यामुळे चीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहे. तसेच दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत.

दरम्यान, चीनने लडाखमध्ये ज्या प्रकारच्या चाली खेळल्या आहेत ते पाहता त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे सरकारमधील अतिविश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या मनात नेमकं काय चाललं आहे हेही संगता येणार नाही. त्यामुळे सद्यस्थिती पाहून लडाखमध्ये अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच केवळ लडाखच नाही तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा फौजेची तयारी पूर्ण झाली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.  

हिमाचल प्रदेशमध्ये इंफंट्रीच्यी तीन डिव्हिजन आणि दोन अतिरिक्त ब्रिगेड तैनात करण्यात आल्या आहेत. तर उत्तराखंडमधील सीमावर्ती भागांमध्ये लष्कराच्या मदतीसाठी  चिन्यालिसोर येथे हवाई दलालासुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे.  सिक्कीममध्येसुद्धा चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताकडून लष्कराची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. 

दरम्यान, चीनशी सीमेवरून मोठ्या प्रमाणात वाद असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा भारताने लष्कर तैनात केले आहे.   इथे ईस्टर्न सेक्टरमध्ये माऊंटेंन स्ट्राइक कोअरला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती अधिकच बिघडली तर त्याचा सामना करण्यासाठी लष्कराने सुकना येथील ३३ कोअर, तेजपूरचे ४ कोअर आणि रांची येथील १७ माऊंटेन स्ट्राइक कोअरला तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीन