शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत पाकिस्तानकडून 'या' 10 वस्तू आयात करतो; घरोघरी होतो वापर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:19 IST

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानची अवस्था श्रीलंकेसारखी होण्याची भीती आहे.

Pakistan Economic Crisis: आपल्या शेजारील देश पाकिस्तानचीअर्थव्यवस्था (Pakistan Economic Crisis) डबघाईला आली आहे. परकीय चलनाचा घटता साठा आणि वाढत्या कर्जामुळे पाकिस्तानचीअर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानातील वाढत्या महागाईचा अंदाज यावरुन लावता येईल की, तिथे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत तब्बल (पाकिस्तान एलपीजी किंमत) 10,000 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचली आहे. पाकिस्तान सरकारनेही देशातील परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. 

पाकिस्तानातून भारतात आयातविशेष म्हणजे, गेल्या अनेक दशकांपासून अनेक गोष्टी पाकिस्तानातून भारतात आयात केल्या जाता. यामध्ये ताजी फळे, सिमेंट आणि चामड्याच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंची मागणीही भारतात जास्त प्रमाणात आहे. 2017 मध्ये, भारताने पाकिस्तानमधून $488.5 मिलियन किमतीच्या वस्तू आयात केल्या आहेत. यामध्ये ड्रायफ्रूट्स, टरबूज आदी फळांचा समावेश होता. पाकिस्तानच्या ताज्या फळांनाही मोठी बाजारपेठ आहे. रिपोर्टनुसार, 2017 मध्ये भारताने पाकिस्तानमधून $89.62 मिलियन (63 कोटी) किमतीची फळे आयात केली. पाकिस्तानातून येणारी फळे काश्मीरमार्गे राजधानी दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचतात.

सिमेंट आणि खडी मीठभारतात विकले जाणारे बिनानी सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानात होते. पाकिस्तानातील मीठ, सल्फर, दगड आणि चुना भारतात मोठ्या प्रमाणात विकला जातो. उपवासासाठी वापरण्यात येणारे खडे मीठ पाकिस्तानातूनच येते. याशिवाय सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाणारी मुलतानी मातीही पाकिस्तानातून येते. याशिवाय चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिकल्सही पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात येतात. भारत आपल्या शेजारी देशाकडून काही वैद्यकीय उपकरणे देखील आयात करतो. भारत पाकिस्तानमधूनही मोठ्या प्रमाणात चामड्याच्या वस्तूंची आयात करतो.

कापूस आणि मेटल कंपाउंडपाकिस्तान भारताला मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात करतो. भारत पाकिस्तानातून पोलाद आणि तांबेही मोठ्या प्रमाणात आयात करतो. पाकिस्तान भारताला नॉन ऑरगॅनिक रसायने, धातू संयुगे निर्यात करतो. साखरेपासून बनवलेले मिठाईचे पदार्थही पाकिस्तानातून येतात. लाहोर कुर्ते, पेशावरी चप्पल देखील भारतात खूप विकल्या जातात.

या गोष्टी पाकिस्तानातून भारतात येतात

  • ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळे
  • सिमेंट
  • रॉक मीठ
  • दगड
  • चुना
  • चष्मा ऑप्टिक्स
  • कापूस
  • स्टील
  • सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगे
  • चामड्याच्या वस्तू
  • पाकिस्तानवर चौफेर हल्ला

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला चौफेर फटका बसला आहे. एकीकडे तो आर्थिक संकटाशी झुंजतोय आणि दुसरीकडे तो अंतर्गत कलहामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत कर्जातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील आपल्या दूतावासाची जुनी इमारत विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंजुरीही मिळाली आहे. पाकिस्तानचा हा दूतावास गेल्या 15 वर्षांपासून रिकामा आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था