शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown : त्वरित देशव्यापी लॉकडाऊन लावा;  कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 10:42 IST

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या टास्क फोर्सनं देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.केंद्रीय टास्कफोर्सचा देशव्यापी लॉकडाऊनचा सल्ला

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारला कोरोना व्यवस्थापनावर सल्ला देणाऱ्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. व्हि.के. पॉल हे या टास्क फोर्सचे प्रमुख असून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भातील माहिती देतात. टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआरसारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत त्वरित या संसर्गाची साखळी तोडण्याची आवश्यतता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताणही आलेला आहे. जर दररोज वाढणाऱ्या संसर्गाचा वेग असाच काम राहिला तर आरोग्य व्यवस्थेची स्थिती अधिक वाईट होऊ शकते. व्यवस्था वाढवण्यासाठीही एक मर्यादा असते. अशा परिस्थितीत आपल्याला संसर्गाची संख्या कमी करावी लागेल आणि ती साखळी तोडावी लागेल. एकमेकांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या संख्येत होणारी मोठी वाढही कमी होईल, असं सदस्य़ांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

आपण चुकीच्या दृष्टीकोनातून पाहतोय"आम्ही गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांगत आहोत की लोकांना लॉकडाऊन हा किती महत्त्वाचा आहे हे सांगितलं जावं. सध्या आपण जसा थोडा थोडा करतोय तसा नाही, तर देशव्यापी लॉकडाऊन हवा. कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे," असं एका सदस्यानं बोलताना सांगितलं."आपण या परिस्थितीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहत आहोत. आरोग्य व्यवस्थेची वाढ करण्यासाठी उत्तम करण्यासाठी एक मर्यादा असते. आपण ऑक्सिजनचा पुरवठा सुधारला आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता आताही ऑक्सिजनची कमतरता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव एकातून दुसऱ्या व्यक्तीत होते. अशा लॉकडाऊन करून संक्रमणाची साखळी तोडणं हा योग्य रस्ता आहे," असं आणखी एका सदस्यानं बोलताना सांगितलं.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी